IMPIMP

‘या’ कारणामुळे तुमचे Demat Account 1 एप्रिल पासून बंद होणार, जाणून घ्या कारण

by nagesh
Demat Account | demat account will be close if you dont did your kyc before 31 march share market update news

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनशेअर बाजारात (Stock Market) गुंतवणूक (Investing) करणाऱ्या प्रत्येकासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवत असाल आणि जर तुमचे डीमॅट (Demat Account) किंवा ट्रेडिंग खाते (Trading Account) असले तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे. कारण 1 एप्रिल पासून तुमचे डिमॅट (Demat Account) अकाऊंट बंद होणार आहे. जर तुम्ही अद्याप केवायसी अपडेट (KYC Update) केली नसेल तर. त्यामुळे 31 मार्चपर्यंत तुमचे केवायसी अपडेट करुन घ्या. अन्यथा खाते बंद होऊ शकते. (Share Market Marathi News)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

खातेदारांना 6 KYC माहिती द्यावी लागेल
नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) आणि सेंट्रल डिपॉझिटरीज सर्व्हिसेस लिमिटेड (CDSL) यांनी जारी केलेल्या परिपत्रकात खातेधारकांना त्यांची 6 KYC माहिती द्यावी लागेल, असे म्हटले आहे. ज्यामध्ये त्यांना त्यांचे नाव, पत्ता, पॅन, मोबाईल नंबर, ई-  मेल आयडी आणि उत्पन्न श्रेणी या सगळ्यांची माहिती द्यावी लागेल.

 

KYC अपडेट करणे आवश्यक
1 जून 2021 नंतर उघडलेल्या नवीन खात्यांसाठी सर्व 6 माहिती देणे अनिवार्य करण्यात आली होती. ज्यामुळे त्यांना हे करणे गरजेचे नाही. मात्र, त्यापूर्वी ज्यांनी खाते ओपन केले आहे, अशांना केवायसी करणे आवश्यक आहे. बाजार नियामक SEBI ने सर्व 6 KYC अपडेट करण्यास सांगितले आहे. त्यामुळे तुम्हाला ते अपडेट करावं लागेल.

 

PAN व्हेरिफाय करा
या परिपत्रकात असे म्हटले आहे की, सिक्युरिटीज मार्केटमधील (Securities Market) व्यवहारांसाठी ग्राहकांच्या वतीने पॅन सादर करण्याची आवश्यकतेमध्ये सुट राहील.
मात्र, गुंतवणूकदारांना आयकर वेबसाइटला (Income Tax Website) भेट देऊन पॅन कार्ड व्हेरिफाय करावे लागेल.
त्यात जर तुमचा पॅन कार्ड आधारशी लिंक नसेल, तर तुमचा पॅन कार्ड वैध मानला जाणार नाही.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

माहिती देताना समस्या असेल तर…
सर्व खातेदारांना स्वतंत्र मोबाईल क्रमांक आणि ई – मेल ॲड्रेस द्यावा लागेल.
मात्र जर तशीच काही समस्या असलेली व्यक्ती आपल्या जवळील व्यक्तीचा मोबाईल नंबर आणि ई – मेल देऊ शकते.
जवळील व्यक्ती म्हणजे जोडीदार, अवलंबून असलेले पालक किंवा मुले.

 

अशी खाती नॉन – कंप्लायंट्स केली जातील
जर एकच मोबाइल क्रमांक किंवा ईमेल आयडी एकापेक्षा जास्त डिमॅट खात्यांमध्ये आढळला आणि कुटुंबाची माहिती देखील अपडेट केली नसेल,
तर अशा डिमॅट (Demat Account) खातेधारकांना 15 दिवसांची नोटीस देऊन त्यांना मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी बदलण्याचा रिक्वेस्ट फॉर्म भरावा लागेल.
जर ते तसे केले नाही, तर तशी खाती नॉन – कंप्लायंट्स (Non – Compliant) केली जातील.

 

Web Title :- Demat Account | demat account will be close if you dont did your kyc before 31 march share market update news

 

हे देखील वाचा :

Jalgaon Crime | खळबळजनक ! मुलाच्या आत्महत्येनंतर वडिलांचीही आत्महत्या

Pune Crime | सोमेश्वरवाडीतील महाशिवरात्री यात्रेत मुलांचा हत्यारासह ‘राडा’; टोळीतील तिघांना अटक

Pune Crime | चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा गळा आवळून खून, पुण्यातील धक्कादायक प्रकार

Sarjeraodada Naik Shirala Sahakari Bank | सर्जेरावदादा नाईक शिराळा सहकारी बँकेचा परवाना रद्द, ‘या’ कारणामुळे RBI ने केली कारवाई

 

Related Posts