IMPIMP

Pune Crime | चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा गळा आवळून खून, पुण्यातील धक्कादायक प्रकार

by nagesh
Pune Crime | Husband killed his wife by stabbing her with a knife due to suspicion of her character, incident in Yerwada

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पत्नीच्या चारित्र्यावर संशय (Doubt over Character) घेऊन तिला मारहाण (Beating) करुन तिचा गळा आवळून खून (Murder In Pune) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना पुण्यातील (Pune Crime) चंदननगर पोलीस ठाण्याच्या (Chandannagar Police Station) हद्दीत बुधवारी (दि.2) सायंकाळी 7.30 ते रात्री 10.30 या कालावधीत लोणकर शाळेमागील (Lonakar School) मोकळ्या जागेत घडली आहे. याबाबत पती विरोधात गुरुवारी (दि.3) सकाळी गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

सिताम्मा किशन उर्फ कृष्णप्पा चव्हाण (वय – 35 रा. लोणकर शाळेमागे, वडगाव शेरी शेवटचा बस स्टॉप) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर आरोपी पती किशन उर्फ कृष्णप्पा तुळप्पा चव्हाण (वय – 42 रा. रा. लोणकर शाळेमागे, वडगाव शेरी (Wadgaon Sheri) शेवटचा बस स्टॉप) याच्या विरुद्ध चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जगन्नाथ होनबा राठोड (वय – 41 रा. मांजरी, हडपसर, मुळ रा. जि. रायचुर, कर्नाटक – Karnataka) यांनी फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती आणि त्याची पत्नी हे लोणकर शाळेच्या मागील बाजूस असलेल्या बाळासाहेब चांदेरे (Balasaheb Chandere) यांच्या मोकळ्या जागेत असलेल्या पत्र्याच्या खोलीत राहतात.
आरोपी हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता.
यातून त्यांच्यामध्ये वाद होत होते. बुधवारी सायंकाळी याच कारणावरुन दोघांमध्ये वाद झाले.
आरोपी पतीने रागाच्या भरात पत्नीला बेदम मारहाण केली. तसेच तिचा गळा आवळून खून केला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला.
आरोपी पती विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विवेक सिसाळ (PSI Vivek Sisal) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Murder of wife on suspicion of character shocking type in Pune

 

हे देखील वाचा :

Sarjeraodada Naik Shirala Sahakari Bank | सर्जेरावदादा नाईक शिराळा सहकारी बँकेचा परवाना रद्द, ‘या’ कारणामुळे RBI ने केली कारवाई

Amol Mitkari | ‘मलिकांवर आरोप करणाऱ्या फडणवीसांनी लाड यांच्या कन्येच्या लग्नात कोणाशी हात मिळवला होता?’ – अमोल मिटकरी

YouTube Earnings | 1 लाख रुपये महिना कमवा YouTube द्वारे, ते सुद्धा केवळ 3 मिनिटे काम करून

 

Related Posts