IMPIMP

Devendra Fadnavis | एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय अचानक झाला नाही, देवेंद्र फडणवीसांचा खुलासा

by nagesh
Maharashtra Politics | devednra fadanvis chief ministers fellowship scheme will be started again

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय अचानक झाला नाही, तर भाजप (BJP) सत्तापिपासू नाही, हे दाखवण्यासाठी आधीपासूनच ठरलं होतं, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केलं. निकालापूर्वीच शिवसेना (Shivsena)-राष्ट्रवादीचं (NCP) ठरलं होतं, त्यामुळे उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) फोन करुनही त्यांनी घेतले नाहीत, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला. सेनापतीच्या मागे कार्यकर्ते भक्कम राहिले की लढाई जिंकतोच, मात्र तिकडे सेनापती झाले आणि मागचे सरदार पळून गेले, अशा शब्दात फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर (Maha Vikas Aghadi Government) टीका केला. पनवेलमध्ये भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते.

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचं अचानक ठरलं नाही, तो निर्णय आधीपासूनच झाला होता. कुठलंही सरकार पाडून सत्ता स्थापन करणारे आम्ही नाही, भाजप सत्तापिपासू नाही, हे आम्हाला दाखवायचं होतं. सत्तेसाठी नाही तर विचारांसाठी परिवर्तन झालं आहे. आमच्यासोबत षडयंत्र झालं, चंद्रकांतदादा आपण भोळे लोक आहोत. युतीच्या काळात आपण शिवसेनेविरोधातील बंडखोर उमेदवार मागे घेतले. पण निकालापूर्वीच शिवसेना-राष्ट्रवादीचं ठरलं होतं. निकालापूर्वीच आपले सर्व मार्ग खुले आहेत, असं शिवसेना नेते सांगत होते. उद्धव ठाकरेंना फोन करुनही त्यांनी घेतले नाहीत. नंबर गेमसाठी सेनेने भूमिका घेतल्याचा दावा फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

जनतेने निवडून दिलेलं सरकार आता सत्तेत आले आहे. जशी माननीय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)
यांच्या विचारांशी फारकत झाली तशी आता त्यांच्या पक्षाबरोबर झाली आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये पहिल्या तीस दिवसांत केवळ स्थगिती देण्यात आली,
आपल्या सरकारमध्ये केवळ प्रगती होत आहे, असंही फडणवीस म्हणाले.

Web Title :- Devendra Fadnavis | deputy cm devendra fadnavis speech in bjp national executive meeting maharashtra political news

हे देखील वाचा :

CM Eknath Shinde | मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…

Shivsena | संजय राऊतांचा बंडखोरांवर घणाघात, म्हणाले – ‘जनता शिंदे गटाची गाढवावरुन धिंड काढणार, उद्धव ठाकरे त्यांना राजकारणातून उठवणार’

Dr. Neelam Gorhe | जनतेच्या मनामधील सिंहासनावर फक्त ठाकरे आणि शिवसेना हेच नाव लिहिलेले आहे आणि असेल – डॉ. नीलम गोऱ्हे

Related Posts