IMPIMP

Shivsena | संजय राऊतांचा बंडखोरांवर घणाघात, म्हणाले – ‘जनता शिंदे गटाची गाढवावरुन धिंड काढणार, उद्धव ठाकरे त्यांना राजकारणातून उठवणार’

by nagesh
Shivsena | shivsena public eknath shinde group will kick the ass uddhav thackeray will lift them from politics mp sanjay raut

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन खरी शिवसेना (Shivsena) कुणाची हे सिद्ध करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election
Commission) शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गटला (Eknath Shinde Group) कागदोपत्री पुरावे (Documentary Evidence) सादर करण्याचे
आदेश दिले आहे. हे पुरावे सादर करण्यासाठी 8 ऑगस्टची मुदत दिल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी संतप्त
प्रतिक्रिया दिली आहे. प्रसारमध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि बंडखोरांवर घणाघाती टीका केली आहे.
आज तुम्ही घोड्यावर बसलेले आहात, मात्र काही दिवसांनी राज्यातील जनता तुमची गाढवावरुन धिंड काढणार, असा इशारा राऊत यांनी दिला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

संजय राऊत म्हणाले, निवडणूक आयोग किंवा अन्य यंत्रणा काय आहेत हे सांगण्याची गरज नाही. ज्यांनी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या शिवसेनेवर (Shivsena) दिल्लीच्या आदेशाने, महाराष्ट्र द्वेष्ट्यांच्या आदेशानं ही वेळ आणली आहे, बाळासाहेबांचा आत्मा वरुन पहतोय. आज तुम्ही घोड्यावर बसलेले आहात, उद्या लोक तुमची गाढवावरुन धिंड काढल्याशिवाय राहणार नाही, माझे शब्द लिहून ठेवा, असे राऊत म्हणाले.

 

तुम्हाला राज्यातील जनता राजकारणातून उठवणार आहेच. आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray) दौऱ्याला शिवसैनिकांचा जोरदार प्रतिसाद मिळतोय. हे पैसे दिलेले फोडलेले लोक नाहीत. बंडखोर आम्ही उठाव केल्याचे सांगत आहेत, पण कसला उठाव? या उठाव मधील उठा म्हणजे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आहे, हे तुम्हाला उठवल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.

 

शिवसेना कुणाची पुरावे द्यावे लागणे हे दुर्दैवी असल्याचे सांगत, संताप व्यक्त केला.
ते म्हणाले, शिवसेना कुणाची हे पुरावे सादर करण्याची वेळ आणावी, यासारखं महाराष्ट्रचं दुर्दैव नाही.
तुम्ही वेगळा गट तयार केला आहे. तुम्ही तुमच्या नवीन संसारात सुखाने रहा.
पण दिल्लीश्वरांना शिवसेना संपवायची आहे. त्याचं हत्यार म्हणून यांना वापरलं जातंय. उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख आहेत.
ही बाळासाहेबांची सेना आहे. आज आमच्यावर पुरावे सादर करण्याची वेळ आणताय,
हे पाप तुम्हाला फेडावं लागेल, असा घणाघात संजय राऊतांनी केला.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Shivsena | shivsena public eknath shinde group will kick the ass uddhav thackeray will lift them from politics mp sanjay raut

 

हे देखील वाचा :

Dr. Neelam Gorhe | जनतेच्या मनामधील सिंहासनावर फक्त ठाकरे आणि शिवसेना हेच नाव लिहिलेले आहे आणि असेल – डॉ. नीलम गोऱ्हे

Pune Rural | पुणे जिल्ह्यात (ग्रामीण) 5 ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

Business Opportunity | मोदी सरकारच्या मदतीने लाखो कमावण्याची संधी, कसे उघडावे आपले जन औषधी केंद्र?

Pune Crime | अंमली पदार्थाची विक्री करणारा नायजेरियन गुन्हे शाखेकडून गजाआड, 12 लाखाचे एम.डी. जप्त

Chandrakant Patil | मुख्यमंत्रीपदाबाबत चंद्रकांत पाटलांचा खुलासा, म्हणाले- ‘दु:ख झालं, मनावर दगड ठेवून केंद्रीय नेतृत्वाचा निर्णय मान्य केला, पण…’

 

Related Posts