IMPIMP

Devendra Fadnavis | उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ विधानाचा देवेंद्र फडवीसांनी घेतला समाचार, म्हणाले…

by nagesh
Devendra Fadnavis | devendra fadnavis react uddhav thackeray challenge get election loksabha vidhansabha

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  Devendra Fadnavis | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena Chief Uddhav Thackeray) यांनी रविवारी गोरेगाव येथील उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात बोलताना आपण एकत्र आलो नाही तर आपल्या देशातच आपल्याला गुलामगिरीत राहावे लागेल. तसेच निवडणुका (Election) घेण्याची हिंमत नाही, हिंमत असेल तर लोकसभा (Lok Sabha), विधानसभा (Legislative Assembly) किंवा महापालिकेच्या निवडणुका (Municipal Elections) एकत्र घ्याव्यात, असं आव्हान त्यांनी भाजपला (BJP) दिले होतं. ठाकरेंच्या या वक्तव्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

उद्धव ठाकरे असं काहीतर बोलत असतात. सध्यातरी भारतीय संविधानानुसार (Indian Constitution) एकत्र निवडणुका होत नाहीत. उद्धव ठाकरे सर्व पक्षाचे नेते झाले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षांना एकत्र करत ‘वन नेशन, वन इलेक्शन’चा पंतप्रधानांनी नारा दिला आहे, त्याला समर्थन द्यावं. मग सर्व निवडणुका एकत्रित घेऊ, असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितलं.

 

आता उत्तर भारतीयांची आठवण आली

उद्धव ठाकरे यांनी केलेल्या हिंदुत्वाच्या वक्तव्यावर विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरेंना जैन आणि उत्तर भारतीयांची आता आठवण येत आहे. त्याचप्रमाणे कोण हिंदुत्ववादी (Hindutva) आहे आणि नाही हे जनतेला माहिती आहे. कोणी जनाब बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) असं लिहून उर्दूत कॅलेंडर काढले, हे सर्व जनतेने पाहिले आहे, असा टोला फडणवीसांनी ठाकरेंना लगावला.

 

तेव्हा नरेंद्र मोदींना माझ्या वडिलांनी वाचवलं

शिवसेना (Shivsena)-भाजपसाठी जेव्हा वाईट दिवस होते. तेव्हा माझ्या वडिलांनी आता जे पंतप्रधान आहोत,
त्यांना वाचवलं होतं. ही गोष्ट खरी आहे. तेव्हा पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (PM Atal Bihari Vajpayee)
होते. ते राजधर्माचं पालन करण्यासाठी बाहेर पडले होते.
वाजपेयी यांनी राजधर्माचं पालन केलं असतं तर आज जे पंतप्रधान पदावर बसलेत, ते तिथे बसलेले दिसले नसते.
पण बाळासाहेब ठाकरेंनी (Balasaheb Thackeray) तेव्हा कोणत्याही गोष्टीची पर्वा केली नाही,
अशी आठवण उद्धव ठाकरेंनी करुन दिली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Devendra Fadnavis | devendra fadnavis react uddhav thackeray challenge get election loksabha vidhansabha

 

हे देखील वाचा :

Kondhwa News | कोंढव्याच्या मदरसांमध्ये दररोज भरते ‘संविधान शाळा’; इनक्रेडीबल समाजसेवक ग्रुपचा उपक्रम

Bigg Boss 16 Grand Finale | पुण्याच्या एमसी स्टॅन बनला ‘बिग बॉस 16’ च्या पर्वाचा विजेता

Pune Crime News | १४ वर्षाच्या मुलाला पळवून नेऊन जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या चालकाला अटक; घरातील पैसे गुपचूप आणण्यास पाडले होते भाग

 

Related Posts