IMPIMP

Bigg Boss 16 Grand Finale | पुण्याच्या एमसी स्टॅन बनला ‘बिग बॉस 16’ च्या पर्वाचा विजेता

by nagesh
 Bigg Boss 16 Grand Finale | bigg boss hindi 16 grand finale mcstan winner lifts the trophy

सरकारसत्ता ऑनलाईन –  ‘बिग बॉस 16’ च्या (Bigg Boss 16 Grand Finale) पर्वाला 1 ऑक्टोबर 2022 पासून सुरूवात झाली होती. प्रेक्षकांमधील सर्वात लोकप्रिय असल्याने बिग बॉस 16 हा कार्यक्रम टीआरपीमध्येही टॉपला राहिला. यादरम्यान घरातील स्पर्धकांनी प्रेक्षकांचे जबरदस्त मनोरंजन केले आहे. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी सलमान खानने (Salman Khan) ‘बिग बॉस’च्या (Bigg Boss 16 Grand Finale) विजेत्याला ट्रॉफी दिली. यावर्षी ‘शिव ठाकरे’ (Shiv Thackeray), ‘ एम. सी. स्टॅन’,’ प्रियांका चहर चौधरी’, ‘अर्चना गौतम’ आणि ‘शालीन भानोत’ हे स्पर्धक टॉप 5 मध्ये दाखल झाले. या पाच जणांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. 12 फेब्रुवारी 2023 ला ‘बिग बॉसच्या महाअंतिम सोहळ्यात रात्री 12 वाजता या पर्वाच्या विजेत्यांचा नाव घोषित केलं गेलं.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

यंदा ‘बिग बॉस’च्या पर्वात सहभागी झालेले सर्व स्पर्धक या कार्यक्रमावेळी उपस्थित होते. त्यांच्यात विविध गंमतीजमतीही पाहायला मिळाल्या. महाअंतिम सोहळा सुरू होताच काहीच तासातचं आधी शालीन भानोत आणि त्यानंतर अर्चना गौतम घराबाहेर पडले. त्यानंतर विजेतेपदाचा महत्त्वाचा दावेदार असणाऱ्या प्रियंकाला घराबाहेर जावे लागले. आणि बिग बॉस १६ च्या पर्वाचं विजेतेपद पुण्याचा रॅपर एम सी स्टॅनच्या नावावर झाले आणि मराठमोळ्या शिव ठाकरेला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले.

 

 

एमसी स्टॅनने शिव ठाकरेला हरवल्याने सर्वांनाच आश्चर्याच्या धक्का बसला.
कारण सुरुवातीपासून शिव ठाकरेंचं खेळ खेळण्याची स्टाईल सर्वाना आवडत होती.
मात्र गेल्या काही आठवड्यात एमसी स्टॅनने जबरदस्त खेळी केली.
बिग बॉस 16 च्या ट्रॉफीवर एम सी स्टॅनने स्वतःच नाव कोरल.
बिग बॉस 16 चे हे पर्व जिंकल्यानंतर ट्रॉफीसोबतच एमसी स्टॅनला 31 लाख 80 हजार आणि नवीकोरी कार जिंकण्याचा मान मिळाला आहे.
एमसी स्टॅन बद्दल बोलायचं झालं तर त्याने वयाच्या 12 व्या वर्षी संगीतक्षेत्रात पदार्पण केलं.
‘समझ मेरी बात को’ या गाण्याच्या माध्यमातून त्याच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.
त्यानंतर त्याचे ‘अस्तगफिरुल्ला’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं.
या गाण्यामुळे एमसी स्टॅनकडे लोकांचा बघण्याचा दृष्टीकोन बदलला.
‘तडीपार’ या अल्बममुळे एमसी स्टॅन लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Bigg Boss 16 Grand Finale | bigg boss hindi 16 grand finale mcstan winner lifts the trophy

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | बोपदेव घाटात पुन्हा युगलाला लुटले

Mumbai Crime News | मुंबईतील आयआयटीमध्ये 19 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट

Pune Crime News | पुण्यातील गुगलचे कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी; धमकी देणार्‍यास हैदराबादहून घेतले ताब्यात

 

Related Posts