IMPIMP

Devendra Fadnavis | काहीही करुन मुंबईत भाजपचा महापौर पाहिजे, BMC ची शेवटची निवडणूक समजून लढा – देवेंद्र फडणवीस

by nagesh
Maharashtra Politics News | thackeray Group mp priyanka chaturvedi tell why she meet hm amit shahmaharashtra

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन मुंबई महानगरपालिका निवडणूक (Brihanmumbai Municipal Corporation Election) आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशात भाजपकडून (BJP) पालिकेवर आपला महापौर बसवण्यासाठी तयारी सुरु केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या (BMC) पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) मुंबई दौऱ्यावर आले आहेत. लालबागच्या राजाचे (Lalbaugcha Raja) दर्शन घेतल्यानंतर अमित शाह यांनी भाजप नेत्यांची बैठक बोलावली. याबैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मार्गदर्शन केले. काहीही करुन मुंबई पालिकेवर भाजपचा महापौर बसला पाहिजे, असे फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

भाजपने अमित शाह यांच्या उपस्थितीत ‘मिशन मुंबई’ला (Mission Mumbai) सुरुवात केली आहे. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना आक्रमक भाषण केले. त्यांनी म्हटले की, संपूर्ण देशाला चाणक्य कोण आहेत हे माहीत आहे आणि चाणक्य अमित शाह आहेत, असे फडणवीसांनी (Devendra Fadnavis) सांगितले.

फडणवीस पुढे म्हणाले, मुंबईत ओरिजनल शिवसेना (Shivsena) आमच्यासोबत आली आहे.
गणेशोत्सवात सगळीकडे भाजपचा बोलबाला आहे.
या भरवशावर शिवसेना राजकारण करत असते आपण त्यांना मागे टाकू.
आपल्या जीवनातील ही शेवटची निवडणूक आहे असे माना आणि अभी नही तो कभी नही असे ठरवा.
आता केवळ एकच लक्ष्य- मुंबई महानगरपालिका असल्याचे आवाहन त्यांनी केले.
आपले ‘मिशन मुंबई’साठी सर्व पदाधिकारी नगरसेवक भाजप कार्यकर्त्यांचे महत्वाची भूमिका आहे. आता सर्वांनी तयारी जोरदार करायची असेही फडणवीस यांनी म्हटले. वॉर्ड रचना काय होईल, कसा प्रभाग असेल याचा विचार करुन चालणार नाही, काम करत रहावे, असे फडणवीस यांनी म्हटले.

 

भाजपचे 135 जिंकण्याचे लक्ष

मागील निवडणुकीत जे निसटलं ते यंदा गमावयाचं नाही, असे मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी म्हटले. मागील निवडणुकीत 50 ते 100 वॉर्डमध्ये पराभव झाला.
आता 135 जागांवर विजय मिळवायचा असल्याचे शेलार यांनी म्हटले.
मुंबई एका भ्रष्टाचारी परिवारात अकडली असल्याची टीका शेलार यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे नाव न घेता केली. आता मुंबईकरांसाठीच आपल्याला मैदानात उतरायचं आहे.
आपल्याला इतिहास रचायचा आहे.
आपण सर्व एका नव्या इतिहासाचे साक्षीदार होणार असून 2017 ला राहिलेले स्वप्न 2022 मध्ये पूर्ण करायचे असल्याचे शेलार यांनी सांगितले.

 

Web Title:  Devendra Fadnavis | fight like this is your last bmc election deputy cm devendra fadnavis appeal bjp activist

 

हे देखील वाचा :

Type 2 Diabetes | टाईप 2 डायबिटीजचे रिस्क फॅक्टर्स आणि बचावाची पद्धती कोणत्या, जाणून घ्या सविस्तर

Union Home Minister Amit Shah | ‘उद्धव ठाकरेंनी धोका दिला, आता त्यांना जमीन दाखवा’, अमित शाह यांनी दंड थोपटले

Blood Type and Risk of Stroke | ‘या’ ब्लड ग्रुपच्या लोकांना कमी वयात स्ट्रोकचा धोका जास्त! स्टडीत झाला खुलासा

 

 

Related Posts