IMPIMP

Type 2 Diabetes | टाईप 2 डायबिटीजचे रिस्क फॅक्टर्स आणि बचावाची पद्धती कोणत्या, जाणून घ्या सविस्तर

by nagesh
Diabetes Diet | Which pulses, vegetables should blood sugar patients eat and which should be avoided? See list

सरकारसत्ता ऑनलाइन –  Type 2 Diabetes | डायबिटीज हा धोकादायक आणि कधी प्राणघातक आजार ठरू शकतो. याचे अनेक प्रकार आहेत, पण आज आपण टाईप 2 डायबिटीजविषयी जाणून घेणार आहोत. अनेक वेळा असे घडते की लोक डायबिटीजचे शिकार होतात, पण त्यांना याची माहितीही नसते. डायबिटीजमुळे शरीर इन्सुलिन तयार करणे थांबवते आणि जर इन्सुलिन तयार होत असेल तर शरीर ते इन्सुलिन वापरण्यास सक्षम नसते. यालाच इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतात. टाईप 2 डायबिटीजचे बळी विशेषतः प्रौढ असतात. टाईप 2 डायबिटीजचे जोखीम घटक कोणते आहेत ते जाणून घेऊया, याबद्दल जर तुम्ही वेळीच जागरूक झालात तर टाईप 2 मधुमेह टाळू शकता. (Type 2 Diabetes)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

टाईप 2 डायबिटीजचे रिस्क फॅक्टर्स
वेब एम डी डॉट कॉम नुसार, वजन वाढत असेल तर त्याचा धोका होऊ शकतो. अनियंत्रित वजन वाढणे म्हणजे टाईप 2 डायबिटीजला निमंत्रण.

याला अनुवांशिक पार्श्वभूमी देखील असते. जर पूर्वज डायबिटीजला बळी पडले असतील, तर तुम्ही देखील टाईप 2 डायबिटीजला बळी पडू शकता.

गर्भधारणेदरम्यान डायबिटीज झाल्यास भविष्यात टाईप 2 डायबिटीज होण्याची शक्यता जास्त असते.

जर नियमित व्यायाम केला नाही तर टाईप 2 डायबिटीजला बळी पडू शकता. (Type 2 Diabetes)

 

टाईप 2 डायबिटीज टाळण्याचे मार्ग

1. सर्वप्रथम जीवनशैली बदलण्याची गरज आहे. नियमितपणे योगा आणि व्यायाम करा आणि आहाराची विशेष काळजी घ्या.

2. वजनाबाबत नेहमी जागरूक राहा, वजन वाढत असेल तर ते कमी करण्याचा प्रयत्न करा.

3. कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसल्यास सर्वप्रथम डॉक्टरांकडे जाऊन रक्त तपासणी करून घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्वतःची काळजी घ्या.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Type 2 Diabetes | know about the risk factors of type 2 diabetes and preventive tips

 

हे देखील वाचा :

Union Home Minister Amit Shah | ‘उद्धव ठाकरेंनी धोका दिला, आता त्यांना जमीन दाखवा’, अमित शाह यांनी दंड थोपटले

Blood Type and Risk of Stroke | ‘या’ ब्लड ग्रुपच्या लोकांना कमी वयात स्ट्रोकचा धोका जास्त! स्टडीत झाला खुलासा

Share Market | 1 वर 8 शेअरची ’भेट’, ही स्मॉलकॅप कंपनी देत आहे बंपर बोनस

 

Related Posts