IMPIMP

Devendra Fadnavis | जुनी पेन्शन योजना लागू करता येणार नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

by nagesh
Devendra Fadnavis | deputy cm devendra fadnavis announced to investigate case of bogus recruitment in the ministry

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन – Devendra Fadnavis | “जुनी पेन्शन योजना लागू केल्यास राज्यावर 1 लाख 10 हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार असल्याने जुनी पेन्शन योजना लागू करता येणार नाही”, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.

 

विनाअनुदान तथा अंशत: अनुदान शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या अनुदानासंदर्भात सदस्य संजय शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नावर झालेल्या चर्चेत विरोधीपक्षनेते अजित पवार, दिलीप वळसे पाटील, डॉ. राजेंद्र शिंगणे, राम शिंदे, आदी सदस्यांनी सहभाग घेतला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुढे म्हणाले की, राज्यातील विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित तत्त्वावर परवानगी दिलेल्या व अनुदानास पात्र घोषित केलेल्या मान्यताप्राप्त खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांना द्यावयाच्या अनुदान सूत्रामध्ये सुधारणा करुन सरसकट 20 टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच यापूर्वी 20 टक्के वेतन अनुदान सुरु असलेल्या शाळांना वाढीव 20 टक्के अनुदान मंजूर करण्याचा निर्णय झाला. हा निर्णय झाला तेव्हा 350 शाळा होत्या, जेव्हा अंमलबजावणी करण्याची वेळ आली तेव्हा 3 हजार 900 एवढी शाळांची संख्या असल्याचे समोर आले. त्यामुळे शासनावरील आर्थिक बोजा वाढला आहे.

उपरोक्त प्रश्नाला उत्तर देताना शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर म्हणाले, “नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनुदान मंजूर करुण्यात आले असून, त्याकरिता अपेक्षित खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे.
तसेच यापुढे केवळ स्वयंअर्थसहाय्यीत शाळा सुरु करता येतील. अनुदानित शाळांना परवानगी मिळणार नाही.
उच्च शिक्षण हे इंग्रजी माध्यमातून असल्यामुळे प्राथमिक शिक्षण इंग्रजीतून घेण्याचा पालकांचा कल आहे.
असे दिसून आले. मात्र यापुढे उच्च शिक्षणदेखील मराठी माध्यमातून देण्यात येईल,
यासाठी मराठीतून पुस्तकेही मराठी भाषांतरित करण्यात येत आहेत.
इंग्रजी भाषेचा पगडा दूर करुन मराठी भाषेतून शिक्षण देण्यात येईल असेही केसरकर म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Devendra Fadnavis Old pension scheme cannot be implemented – Deputy Chief Minister Devendra Fadnavis

 

हे देखील वाचा :

khadakwasla Dam | खडकवासला धरणाच्या पाण्यात बुडून तरुण-तरुणीचा मृत्यू, मृत्यूचे कारण अस्पष्ट

Anil Deshmukh | देशमुखांचा जेलमधील मुक्काम वाढला, हायकोर्टाने जामीनावरील स्थगिती वाढवली

Winter Session -2022 | क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक उभारणीबाबतचा अहवाल आठवडाभरात सादर करा, मुख्यमंत्र्यांचे पुणे जिल्हाधिकारी, पालिका आयुक्तांना निर्देश

 

Related Posts