IMPIMP

Devendra Fadnavis | ‘तिसरा उमेदवार विचार करून दिला आहे, आम्हाला घोडेबाजार करायचा नाही’ – देवेंद्र फडणवीस

by nagesh
Devendra Fadnavis | devendra fadnavis special cyber prject in the state steps will be taken by the state government to crack down on pornographic disorders

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Devendra Fadnavis | राज्यसभेच्या 57 जागांसाठी निवडणुकीचे (Rajya Sabha Election 2022) बिगुल वाजलं आहे. महाराष्ट्रातील सहा जागेच्या उमेदवारीवरुन सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेनेने (Shivsaena) कोल्हापूरमधील शिवसेना नेते संजय पवार (Sanjay Pawar) यांना उमेदवारी दिली. त्यानंतर आता भाजपनेही (BJP) सहाव्या जागेसाठी कोल्हापूरमधील भाजप नेते धनंजय महाडीक (Dhananjay Mahadik) यांना उमेदवारी दिली. यानंतर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी घोडेबाजार सुरु करण्याची विरोधकांची ईर्षा असल्याचं म्हटलं. यानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, ”आम्हाला घोडेबाजार करायचा नाही, आमचे तीनही उमेदवार निवडून येणार आहेत. त्यांनी निर्णय घेतला पाहिजे, आमचे 3 आणि त्यांचे 3, त्यांनी एक उमेदवार मागे घेतल्यास घोडेबाजार होणार नाही,” अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दरम्यान, महाराष्ट्रातील भाजपच्या उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यामध्ये केंद्रीय मंत्री पियूष गोयल (Piyush Goyal), माजी मंत्री अनिल बोंडे (Anil Bonde) आणि माजी खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

 

”जरी त्यांनी तिसरा उमेदवार ठेवला, तरी काही फरक पडणार नाही, आमचे उमेदवार निवडून येणार आहेत, ते महाराष्ट्रातील असून भाजपचे आहेत, राजकीय सक्रीय आहेत. मला पूर्ण विश्वास आहे, सद्सद्वविवेक बुद्धीने काही लोक आम्हाला मतदान करणार आहेत. निश्चित आमचे उमेदवार निवडून येतील, ज्याअर्थी आम्ही तिसऱ्या उमेदवाराचा अर्ज भरला आहे त्या अर्थी निश्चित आम्ही विचार केला आहे आणि निवडून आणू.” असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

 

दरम्यान, भाजप 2, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीचा 1 उमेदवार विजयी होणार आहे. तसेच, सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजप यांनी आपले उमेदवार मैदानात उतरवले आहेत. त्यामुळे शिवसेना आणि भाजप यांच्यात मोठी चुरस लागणार आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणात आणखी नवी चर्चा रंगणार हे नक्कीच..

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

विधानसभेतील संख्याबळ –
भाजप –
106 आमदार
शिवसेना – 55 आमदार
राष्ट्रवादी – 54 आमदार
काँग्रेस – 44 आमदार

 

Web Title :- Devendra Fadnavis | the third candidate we will get elected firm belief of bjp leader devendra fadnavis

 

हे देखील वाचा :

Mumbai-Pune Expressway | मुंबई पुण्याच्या जवळ येणार म्हणजे नेमकं काय होणार, कशामुळं प्रवाशांचा 25 मिनीटं वेळ वाचणार; जाणून घ्या

UPSC 2021 Results Ranking | यूपीएससीचा निकाल जाहीर ! यंदा मुलींचा डंका; श्रुती शर्मा भारतातून पहिली, पहिल्या 5 मध्ये 4 मुली

Aloe Vera Benefits For Diabetes | मधुमेहात कोरफड गुणकारी? जाणून घ्या याचे आरोग्यदायी फायदे

 

Related Posts