IMPIMP

Dhananjay Munde | धनंजय मुंडे बारामतीमध्ये कडाडले, म्हणाले – ‘भाजपला महाराष्ट्राच्या मातीत गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही’

by nagesh
Dhananjay Munde | ncp leader and minister dhananjay munde on bjp in baramati in presence of sharad pawar

बारामती : सरकारसत्ता ऑनलाइन –  आमच्या शक्तीपीठावर हल्ला करुन काहीतरी यश मिळेल, असं भाजप (BJP) विचारधारेला वाटतेय. मात्र, भाजपला महाराष्ट्राच्या मातीत गाडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा घणाघात राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी बारामतीत (Baramati) केला. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या बारामतीमधील गोविंदबाग (Govindbagh) या निवसस्थानी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादीचे (NCP) नेते पवार कुटुंबाची भेट घेतात. यंदा धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे देखील उपस्थित होते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी (दि.5) बारामतीत येथे पाडव्यानिमित्त ज्येष्ठ नेते शरद पवारांना शुभेच्छा दिल्या. यावेळी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) पत्रकारांशी बोलत होते. यावेळी मुंडे म्हणाले, शरद पवार यांना भेटण्यासाठी आम्ही दरवर्षी येत असतो. पवारांना भेटल्यावर आम्हाला काम करण्यास एक ऊर्जा मिळते. तर साक्षात विठ्ठलाचे दर्शन झाल्यासारखे वाटते, भाजपला महाराष्ट्राच्या मातीत गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.

 

पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या नसल्याचे देखील त्यांनी सांगितले. ज्यावेळी शुभेच्छा मिळतील त्यावेळी आपणाला कळवले जाईल, अशी टिप्पणीही धनंजय मुंडे यांनी केली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title : Dhananjay Munde | ncp leader and minister dhananjay munde on bjp in baramati in presence of sharad pawar

 

हे देखील वाचा :

PMGKAY | देशातील 80 कोटी गरीबांना नोव्हेंबरनंतर सुद्धा मिळणार का मोफत रेशन? केंद्रीय सचिवांनी दिली ‘ही’ माहिती

Mumbai Cruise Drug Case | समीर वानखेडेंना मोठा धक्का ! आर्यन खान, नवाब मलिकांच्या जावयाच्या केससह 6 प्रकरणांचा तपास मुंबई झोनकडून काढला; पण…

Accident News | दुर्देवी ! भाऊबीजेला मामाकडे जाताना भीषण अपघात; सख्ख्या बहिण-भावाचा मृत्यू, इतर दोघे गंभीर

 

Related Posts