IMPIMP

Diabetes | बहुतांश लोकांना ‘या’ 4 कारणांमुळे होतो डायबिटीज, रहा सावध

by nagesh
Diabetes | diabetes chronic diseases causes and symptoms warning signs blood sugar control

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Diabetes | मधुमेह हा असा आजार आहे की एकदा झाला की तो आयुष्यभर तुमच्यासोबत राहतो. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, पाचपैकी एका व्यक्तीला मधुमेह आहे हेही माहीत नसते. मधुमेहामध्ये, शरीर पुरेसे इन्सुलिन तयार करू शकत नाही किंवा शरीर जितके इन्सुलिन बनवते तितके वापरण्यास सक्षम नसते. शरीरात इन्सुलिनच्या कमतरतेमुळे पेशी प्रतिसाद देणे बंद करतात. (Diabetes)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

ही स्थिती दीर्घकाळ राहिल्यास शरीरात हृदय, डोळ्यांची कमजोरी किंवा किडनीशी संबंधित अनेक गंभीर आजार उद्भवतात. हा आजार होण्यामागे काही खास कारणे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

1. आनुवंशिक आजार (Genetics) –
आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर तुमच्या कुटुंबातील कोणाला मधुमेह असेल तर तुम्हालाही हा आजार होण्याची शक्यता वाढते. त्याचबरोबर ज्या लोकांना मधुमेहाचा कौटुंबिक इतिहास नसेल, तर त्यांना या आजाराचा धोका कमी असतो. (Diabetes)

2. लठ्ठपणा (Obesity) –
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जेव्हा एखाद्या व्यक्तीचे वजन जास्त असते तेव्हा शरीराला ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल (Blood Sugar Level Control) करणे कठीण होते. यामुळे बहुतेक लोक प्री-डायबिटीसचे बळी ठरतात. या अवस्थेत ब्लड शुगर कंट्रोल न राहिल्यास मधुमेह होतो.

3. सुस्त जीवनशैली (Sedentary Lifestyle) –
शरीर नेहमी क्रियाशील राहणे अत्यंत आवश्यक आहे. जे लोक व्यायाम (Exercise) करत नाहीत त्यांना जुनाट आजार होण्याचा धोका जास्त असतो. संशोधनानुसार जे लोक नियमित व्यायाम करतात ते मधुमेहापासून सुरक्षित राहतात.

4. खूप गोड खाणे (Eating too much sweet food) –
खूप गोड खाल्ल्याने ब्लड शुगर वाढते. या साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी शरीर इन्सुलिन सोडते.
कालांतराने, साखरेचे जास्त प्रमाण शरीराला इन्सुलिनलप्रती कमी संवेदनशील बनवते. त्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

कसा टाळावा मधुमेह (Preventing Diabetes) –
मधुमेह टाळण्याचा उत्तम मार्ग म्हणजे लहानपणापासूनच आपल्या आरोग्याची काळजी घेणे.
निरोगी खाण्याची सवय लावा आणि दररोज व्यायाम करा.
जास्त गोड खाणे टाळा.
सक्रिय जीवनशैलीचा अवलंब करा.
वेळोवेळी डॉक्टरांकडून तपासणी करत रहा.

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Web Title :- Diabetes | diabetes chronic diseases causes and symptoms warning signs blood sugar control

हे देखील वाचा :

Shambhuraj Desai | अवैध हातभट्टी बंद करण्यासाठी मोहीम राबवा, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश

Cooking Tips | चुकूनही ‘हे’ 3 पदार्थ मायक्रोवेव्हमध्ये करू नका गरम, जेवण होईल विष

Shivsena Dasara Melava | शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास दोन्ही गटांना BMC चा नकार

Related Posts