IMPIMP

Diabetes | आंधळेपणा-किडनी फेल, ‘या’ 6 अवयवांना सर्वप्रथम डॅमेज करतो डायबिटीज

by nagesh
Kidney Health | kidney health swami ramdev ayurveda treatment for kidney

नवी दिल्ली : वृत्तसंस्था डायबिटीजचा (Diabetes) आजार तरूण पीढीला सुद्धा होऊ लागला आहे. हाय ब्लड शुगरचा आजार जर अनियंत्रित झाला तर मनुष्याला मृत्यूच्या दरवाजापर्यंत पोहचवतो. डॉक्टर्स म्हणतात, हेल्दी लाईफस्टाईल अवलंबून डायबिटीजपासून (Diabetes) बचाव करता येऊ शकतो. योग्यवेळी लक्ष न दिल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

डायबिटीजबाबत (Diabetes)
लोकांना जागरूकर करण्यासाठी दरवर्षी 14 नोव्हेंबरला वर्ल्ड डायबिटीज-डे साजरा केला जातो. डायबिटीच्या भयंकर आजाराचा परिणाम शरीराच्या कोण-कोणत्या अवयवांवर सर्वात जास्त होतो, ते जाणून घेवूयात…

1. अंधळेपणा –

डायबिटीज (Diabetes) टाईप 2 च्या रूग्णांना अस्पष्ट दिसू लागते. डायबिटीज डोळ्यांच्या छोट्या ब्लड वेसल्सचे नुकसान करतो. यामुळे ग्लूकोमा, मोतीबिंदू आणि डायबिटिक रेटिनोपॅथीचा धोका वाढतो. काही काळानंतर डोळे कमजोर होतात.

2. नसा डॅमेज –

डायबिटीज टाईप 2 असेल तर नसा डॅमेज होणे आणि डायबिटिक न्यूरोपॅथीचा धोका आणखी वाढतो. हा तुमच्या हात आणि पायांवर परिणाम करतो. याची लक्षणे सुन्न होणे, झिणझिण्या किंवा जळजळ, वेदना, डोळ्यांच्या समस्या आणि कमजोरी आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 3. हार्ट डॅमेज –

जर तुम्ही डायबिटीजला नियंत्रित केले नाही तर हाय ब्लडप्रेशर आणि हृदयाच्या आजारांचा धोका वाढू शकतो. जर तुम्ही टाइप 2 डायबिटीजने पीडित असाल तर लो सोडियम डाएट घ्या आणि नियमित प्रकारे आपले बीपी चेक करा.

4. पायांचा अल्सर –

नसा आणि ब्लड सर्क्युलेशन खराब झाल्याने पायांना अल्सरसारखी समस्या होऊ शकते. हा पायाचा अल्सर कधी-कधी संक्रमित सुद्धा होऊ शकतो. पायांच्या अल्सरपासून वाचण्यासाठी, डायबिटीजच्या रूग्णांनी आपले पाय स्वच्छ आणि कोरडे ठेवले पाहिजेत. आरामदायक आणि हलके मोजे घालावे. पायांना जखम झाल्या डॉक्टरांकडे जा.

5. किडनी खराब होणे –

ब्लड शुगर लेव्हल वाढण्याचा थेट परिणाम किडन्यांवर होतो. यामुळे किडनीची फिल्टर करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. यासाठी रूग्णांनी काळजी घेतली पाहिजे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

6. तोंडाशी संबंधीत आजार –

टाईप 2 डायबिटीज (Diabetes) नियंत्रित ठेवला नाही तर ओरल हेल्थ बिघडू शकते.
या स्थितीत त्या ब्लड वेसल्सचे नुकसान होते ज्या दात आणि हिरड्या ठिक ठेवतात.
यामुळे दात आणि हिरड्यांमध्ये संसर्गाचा धोका वाढतो.
यासाठी आवश्यक आहे की तुम्ही ओरल हायजीनची पूर्ण काळजी घेतली पाहिजे.

 

Web Title: Diabetes | effects of diabetes on the body and organs along with blindness and kidney failure

 

हे देखील वाचा :

Amazon | अ‍ॅमेझॉनवर कढीपत्त्याच्या नावाखाली गंजाची तस्करी, पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश; जाणून घ्या प्रकरण

Diabetes | हाता-पायांची सूज सुद्धा आहे अनियंत्रित मधुमेहाचा इशारा, ‘या’ 10 लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

Babasaheb Purandare | ज्येष्ठ इतिहासकार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं पुण्यात निधन

 

Related Posts