IMPIMP

Digital Transaction On Whatsapp | बँक अकाऊंट लिंक न करता सुद्धा व्हॉट्सअपद्वारे पाठवू शकता पैसे, जाणून घ्या प्रक्रिया

by nagesh
WhatsApp Payment | identity verification is now required for whatsapp payment know in details

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Digital Transaction On Whatsapp | व्हॉट्सअपची पेमेंट सर्व्हिस (Payment Service) आता भारतात सर्व यूजरसाठी उपलब्ध झाली आहे. फेसबुक (Facebook) ची मेसेजिंग सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी व्हॉट्सअपने डिजिटल ट्रांजक्शन (Digital Transaction On Whatsapp) सोपे बनवण्यासाठी अ‍ॅपमध्ये नवीन अपडेट दिले आहे. व्हॉट्सअपची पेमेंट सर्व्हिस युपीआय (UPI) सिस्टमवर बेस्ड आहे. मात्र, तुम्ही व्हॉट्सअपवर आपले अकाऊंट लिंक न करता सुद्धा ट्रांजक्शन करू शकता.

अकाऊंट लिंक न करताही करा ट्रांजक्शन

युपीआय ट्रांजक्शन एका बँक अकाऊंटमधून दुसर्‍या बँक अकाऊंटदरम्यान व्यवहार होतो. इतर यूपीआय बेस्ड अ‍ॅपप्रमाणे तुम्ही व्हॉट्सअपवर सुद्धा आपले बँक अकाऊंट लिंक करू शकता. (Digital Transaction On Whatsapp)

याद्वारे तुम्ही थेट व्हॉट्सअपवर कुणाकडूनही पैसे मागवू शकता आणि कुणालाही पैसे पाठवू शकता. यामध्ये अट केवळ ही आहे की, तुम्ही ज्या नंबरवरून व्हॉट्सअप वापरत आहात, तो नंबर कोणत्या ना कोणत्या बँक खात्यासोबत लिंक्ड असावा. असे असेल तर अकाऊंट व्हॉट्सअपला न जोडता सुद्धा ट्रांजक्शन (Digital Transaction On Whatsapp) करू शकता.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

 WhatsApp मध्ये अकाऊंट लिंक न करता असे रिसिव्ह करा पैसे :

– अ‍ॅक्सेप्ट पेमेंट ऑपशनवर क्लिक करा.

– टर्म्स आणि प्रायव्हसी पॉलिसी अ‍ॅक्सेप्ट करा आणि कंटीन्यू करा.

– एसएमएसच्या माध्यमातून व्हेरिफाय करण्याचा पर्याय निवडा.

– आता मोबाइल नंबरवरून लिंक्ड सर्व बँक अकाऊंट दिसतील.

– ज्या अकाऊंटमधून पैसे मागवायचे आहेत, तो सिलेक्ट करा.

– आता डन पर्याय निवडा. यानंतर तुमच्या खात्यात पैसे रिसिव्ह करू शकता.

WhatsApp मध्ये अकाऊंट लिंक न करता पाठवा पैसे :

– ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहेत त्याचे चॅट ओपन करा.

– अटॅचमेंटच्या बाजूला रुपयाच्या साईनवर क्लिक करा.

– आपल्या डेबिट कार्ड नंबरचे शेवटचे 6 डिजिट आणि एक्सपायरी डेट व्हेरीफाय करा.

– यानंतर सेटअप युपीआय पिन निवडा.

– आता वन-टाइम पासवर्ड (ओटीपी) एंटर करा.

– यूपीआय पिन तयार करा आणि एंटर करा.

– सेटअप युपीआय पिनवर क्लिक करा आणि सबमिट करा.

– युपीआय सेटअप होताच कुणालाही व्हॉट्सअपद्वारे पैसे पाठवू शकता. (Digital Transaction On Whatsapp)

 

Web Title: Digital Transaction On Whatsapp | know how to make digital transaction on whatsapp without linking bank account like other upi based services

 

हे देखील वाचा :

Benefits of Black Pepper Tea | पोटाची चरबी कमी करायची असेल तर प्या काळी मिरीचा चहा, होतात अनेक जबरदस्त फायदे

Pune Crime | पुण्यात वडिलांच्या अस्थी विसर्जनासाठी गाडी घेऊन जाऊन केली फसवणूक

Sangli-Kolhapur Four Lane Road | रस्त्याची दुरवस्था रोखण्यासाठी कोल्हापूर-सांगली रस्त्याचे चौपदरीकरण

Pune Cyber Crime | गंडविण्यासाठी सायबर चोरट्यांची अफलातून ‘आयडिया’; चित्रकाराला घातला 80 हजारांचा गंडा

 

Related Posts