IMPIMP

Sangli-Kolhapur Four Lane Road | रस्त्याची दुरवस्था रोखण्यासाठी कोल्हापूर-सांगली रस्त्याचे चौपदरीकरण

by nagesh
Sangli-Kolhapur Four Lane Road | Four laning of Kolhapur-Sangli road to prevent poor condition of the road

कोल्हापूर :  सरकारसत्ता ऑनलाइन Sangli-Kolhapur Four Lane Road | सांगली ते कोल्हापूर रस्त्याची दुरवस्था बघायला झाली आहे. याला अटकाव घालवण्यासाठी येथील रस्त्याचे चौपदरीकरणाचे (Sangli-Kolhapur Four Lane Road) काम हाती घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या National Highway Authority of India (NHAI) मार्फत या चौपदरीकरणाचे काम करण्यात येणार आहे. याबाबत चौपदरीकरणासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यास केंद्रीय मंत्रालयाकडून मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या स्थानिक कार्यालयातर्फे आगामी प्रक्रिया सुरू झाल्याने चौपदरीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

कोल्हापूर-सांगली (Sangli-Kolhapur Four Lane Road) या रस्त्याची सध्या दैना झाली आहे. ठेकेदाराने केवळ 65 ते 70 टक्के काम करून टोल लावण्याची भूमिका घेतल्याने संघर्ष सुरू झाला. त्याचबरोबर हा वाद लवादाकडे गेल्याने प्रक्रिया रखडली. या रस्त्यावर राज्य सरकारने वीस कोटी रुपये खर्च केला. पंरतु, या निधीतून कोणती कामे झाली, याचा मात्र अजुन खुलासा नाही. तर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे (NHAI) हा रस्ता हस्तांतरण केल्यानंतर केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाने (Union Ministry of Road Development) या रस्त्याच्या चौपदरीकरणाचा (Sangli-Kolhapur Four Lane Road) दीड कोटी रुपयांचा डीपीआर (DPR) तयार करण्यास मंजुरी दिली. यावरुन कोल्हापूर कार्यालया मार्फत सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयाक करण्याचे काम सुरु आहे. यानंतर तातडीने दुरूस्तीच्या कामाला गती येणार आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

दरम्यान, कोल्हापूर (Kolhapur) लगतची असणारी गावे म्हणजे हातकणंगले, अतिग्रे, निमशिरगाव, तमदलगे आदी ठिकाणी अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडी होते.
या ठिकाणी अपघात होत आहेत. हातकणंगले आयटीआय (hatkanangale iti college), मजले, लक्ष्मीवाडीतील रस्ते खचले आहेत.
त्यामुळे हे ठिकाणे धोकादायक बनले आहे. त्यामुळे खचलेल्या रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
या कारणाने राज्य सरकारकडून (Maharashtra Government) 20 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला.
मात्र या निधीतुन रस्ता दुरुस्ती शक्य नसल्याने रस्त्यावरील कामे अर्धवट झाली आहेत.
यामुळे आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) मार्फत या चौपदरीकरणाचे काम होणार असल्याने येथील असणारी अवस्था संपणार आहे.
त्यामुळे अपघातही कमी होणार आहे.

 

Web Title :- Sangli-Kolhapur Four Lane Road | Four laning of Kolhapur-Sangli road to prevent poor condition of the road

 

हे देखील वाचा :

Pune Cyber Crime | गंडविण्यासाठी सायबर चोरट्यांची अफलातून ‘आयडिया’; चित्रकाराला घातला 80 हजारांचा गंडा

BJP MP Raksha Khadse | राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंविरूध्द निवडणूक लढविणार्‍या भाजपच्या खा. रक्षा खडसेंना मोठा धक्का

Pune Crime | पुण्यात सुनेने चुलीतील जळक्या लाकडाने सासर्‍याला केली मारहाण; बारामती तालुका पोलिस ठाण्यात FIR

 

Related Posts