IMPIMP

Dilip Walse Patil About Loudspeaker On Mosque | मशिदीवरील भोंगे काढण्याबाबत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

by nagesh
Dilip Walse Patil About Loudspeaker On Mosque | dilip walse patil there is no question of removing that horn home minister spoke clearly on raj thackerays ultimatum

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Dilip Walse Patil About Loudspeaker On Mosque | मशिदींवरील भोंग्यासंबंधी सर्व मशिदींना 3 मे पर्यंत मुदत देतो, या नंतर जर कोणी भोंगे काढले नाहीत तर देशभरातील मशिदींसमोर हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) लावण्यात येईल असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी राज्य सरकारला दिला होता. राज ठाकरेंच्या या आदेशामुळे राज्यातील वातावरण तापलं आहे. सत्ताधारी पक्षातील राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसने (Congress) याला विरोध केला आहे. मात्र अशातच यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील (Dilip Walse – Patil) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Dilip Walse Patil About Loudspeaker On Mosque)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

न्यायालयाने (Court) आपल्या निर्णयात मशिदींवरील भोंगे उतरवा असं कुठंही सांगितलं नाही. न्यायालयाने रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपनाला (Acoustics) बंदी घातली आहे. ज्या मशिदींनी, मंदिरांनी परवानगी घेत कायद्याचं पालन करत आहेत, तेथील लाऊडस्पीकर काढायचा प्रश्नच येत नसल्याचं दिलीप वळसे – पाटील यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना वळसे पाटलांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालावरही (Kolhapur North By Election Result 2022) भाष्य केलं आहे. (Dilip Walse Patil About Loudspeaker On Mosque)

 

जनतेने भाजपच्या धार्मिक प्रचाराला नाकारलं, जयश्री जाधव यांनी मिळवलेला विजय हा अपेक्षित असल्याचं दिलीप वळसे – पाटील म्हणाले.
जयश्री जाधव या 18, 901 मतांनी विजयी झाल्या आहेत. या विजयाचा उत्साह कोल्हापूरसह राज्यात दिसून येत आहे.

 

दरम्यान, राज ठाकरे आणि राज्य सरकार भोंग्यांच्या मुद्द्यांवरून आता आमने – सामने येणार असल्याचं दिसत आहे.
कारण राज ठाकरे यांनी 3 मेपर्यंत मशिदीवरील भोंगे काढण्याची मुदत दिली आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारला हे मान्य नाही.
याबाबत आता गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं असल्यामुळे पुढे काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Dilip Walse Patil About Loudspeaker On Mosque | dilip walse patil there is no question of removing that horn home minister spoke clearly on raj thackerays ultimatum

 

हे देखील वाचा :

MLA Rohit Pawar | ‘निमंत्रण आल्यास मी सुद्धा आदित्य ठाकरेंसोबत आयोध्या दौऱ्यावर जाईन’ – रोहित पवार

Pune Crime | दुचाकीचा हॉर्न वाजवल्याने भर रस्त्यात तरुणाला बेदम मारहाण, चौघांवर FIR तर एकाला अटक

Pune Kothrud Sanskrutik Mahotsav | कोथरूड सांस्कृतिक महोत्सवाचे 19 ते 22 एप्रिल दरम्यान आयोजन – मुरलीधर मोहोळ

 

Related Posts