IMPIMP

MLA Rohit Pawar | ‘निमंत्रण आल्यास मी सुद्धा आदित्य ठाकरेंसोबत आयोध्या दौऱ्यावर जाईन’ – रोहित पवार

by nagesh
Rohit Pawar | rohit pawar reaction on aditya thackeray janaakshrosh morcha

जालना : सरकारसत्ता ऑनलाइन MLA Rohit Pawar | मागील काही दिवसांपासून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन राज्यात राजकीय वातावरण चांगलंच
तापलं असल्याचं दिसत आहे. याच मुद्द्यावरुन भाजप (BJP) सतत शिवसेनेला (Shivsena) डिवचताना दिसत आहे. मनसे (MNS) देखील हिंदुत्वाच्या
मुद्द्यावरुन शिवसेनेला डिवचत आहे. दरम्यान, आता राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) अयोध्याला (Ayodhya) जाणार
आहेत. यावरही विरोधकाकडून टीका होत असतानाच आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी त्यांची पाठराखण केली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

आदित्य ठाकरेंची पाठराखण करत निमंत्रण आल्यास मी सुद्धा त्यांच्यासोबत आयोध्या दौऱ्यावर जाईल असं रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी म्हटलं आहे. जालना (jalna) या ठिकाणी एका कार्यक्रमा दरम्यान बोलताना रोहित पवार यांनी याबाबत इच्छा बोलून दाखवली आहे. या दरम्यान आता आदित्य ठाकरे, रोहित पवारांना आमंत्रण देतात का ? हे पाहावे लागणार आहे.

 

आदित्य ठाकरे हे मे महिन्याच्या प्रारंभी अयोध्येला जाऊन श्रीरामाचे दर्शन घेणार आहेत. तसेच, हा दौरा यशस्वी करण्याची जबाबदारी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आलीय. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या उपस्थितीत काल (शुक्रवारी) आदित्य ठाकरेंच्या या दौऱ्याचा आढावा घेण्यात आला आहे. तसेच, हिंदुत्वाची जबाबदारी आता भाजपवर असल्याचे सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेनेचे हिंदुत्व खोटे असल्याचा दावा केला. आता मनसेनेही हिंदुत्वाच्या दिशेने आगेकूच करीत आपला झेंडा भगवा करून शिवसेनेच्या हिंदुत्वावरच शंका उपस्थित केली.

 

Web Title :- MLA Rohit Pawar | NCP MLA rohit pawar wants to go to ayodhya with aditya thackeray

 

हे देखील वाचा :

Pune Crime | दुचाकीचा हॉर्न वाजवल्याने भर रस्त्यात तरुणाला बेदम मारहाण, चौघांवर FIR तर एकाला अटक

Pune Kothrud Sanskrutik Mahotsav | कोथरूड सांस्कृतिक महोत्सवाचे 19 ते 22 एप्रिल दरम्यान आयोजन – मुरलीधर मोहोळ

Jayant Patil On Chandrakant Patil | ‘चंद्रकांतदादा हिमालयात जाणार असतील तर मीही हिमालयात जाईल’; ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळातील बड्या मंत्र्याचं वक्तव्य !

 

Related Posts