IMPIMP

Dilip Walse Patil | नवाब मलिकांच्या आरोपानंतर राज्य सरकार समीर वानखेडेंची चौकशी करणार? गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले…

by nagesh
Dilip Walse Patil On ED | Mumbai Police SIT on serious allegations against ED officials Additional Commissioner of Police IPS Viresh Prabhu to inquire Home Minister Dilip Walse Patil

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  Dilip Walse Patil | मुंबईच्या समुद्रातील क्रूझवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) ड्रग्ज पार्टीवर छापेमारी केली होती. यात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह (Aryan Khan) अनेकांना एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे. यावरुन राज्यात अनेक चर्चासत्र रंगले आहे. याप्रकरणी अनेकांची एनसीबीकडून चौकशी करण्यात येत आहे. या कारवाईनंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) हे सतत एनसीबी आणि एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत. यानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

राज्य सरकार समीर वानखेडे यांची चौकशी करणार का? पत्रकारांच्या या सवालावर दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) म्हणाले की, समीर वानखेडे हे केंद्र शासनाच्या सेवेत आहेत.
त्यामुळे राज्य सरकारने त्यांची चौकशी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. असे वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.
वर्षभरात तुझी नोकरी जाईल आणि तुझा तुरुंगवास निश्चित आहे.
असं नवाब मलिक यांनी समीर वानखडेला म्हटलं आहे. यावरही वळसे पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे.

वळसे पाटील म्हणाले, नवाब मलिक यांनी काही विधान केलं असेल तर त्याबाबत मला अद्याप काहीही माहिती नाही.
तसंच त्यांनी असा कोणताही पुरावा माझ्याकडे अद्याप दिलेला नाही. मी त्यांच्याकडून माहिती घेईन पण आता तरी माझ्याकडे कोणतीच माहिती नाही, असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.

 

नेमकं प्रकरण काय?

 

एनसीबीचे अधिकारी समीर वानखडे या दुबईत जाऊन बॉलिवूड स्टार्सकडून पैसे वसूल करत असल्याचा आरोप मंत्री नवाब मलिक यांनी केला होता.
वानखडे हा भ्रष्ट अधिकारी असून आपले काळे धंदे तो दुबईतून चालवत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
हे आरोप धादांत खोटे असल्याचं सांगत आपण कधी दुबईला गेलोच नव्हतो, असा दावा समीर वानखडेनं केला होता.
त्यानंतर आता 10 डिसेंबर 2020 या दिवशी समीर वानखडे दुबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये बसल्याचे काही फोटो ट्विटरवर अपलोड करत नवाब मलिक यांनी पुरावे देत असल्याचा दावाही केला आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

Web Title : Dilip Walse Patil | nawab malik serious allegations on sameer wankhede maharashtra home minister dilip walse patil said

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | ‘NCB प्रकरणात पार्थ पवारांचं नाव घेतलं जातंय’; अजित पवार म्हणाले – ‘उगाच कोणाच्या तरी…’

Mumbai High Court | ‘सुबोध जयस्वाल स्वतः आत्मपरीक्षण करून यामध्ये संभाव्य आरोपी म्हणून पाहावे’; राज्य सरकारतर्फे उच्च न्यायालयात युक्तीवाद

Ajit Pawar | ‘राष्ट्रवादीच्या मंत्र्याने NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली’, अजित पवार म्हणाले…

 

Related Posts