IMPIMP

Dilip Walse-Patil | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे-पाटील यांचे भाजपवर जोरदार टीकास्त्र; म्हणाले…

by nagesh
Dilip Walse-Patil | ncp leader dilip valse patil criticizes bjp

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  Dilip Walse-Patil | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी ट्वीट करत भाजपवर निशाना साधला. नाशिक पदवीधर मतदारसंघात भाजपने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. तर दुसरीकडे काँग्रेसचा एबी फॉर्म दिला गेला असून विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल न केल्यामुळे राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. आपल्या मुलाला उमेदवारी देण्यासाठी डॉ. सुधीर तांबे यांनी स्वतःचा उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यानंतर या सर्व घडामोडींवर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून टीका करण्यात येत आहे. (Dilip Walse-Patil)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे-पाटील(Dilip Walse-Patil) यांनी ट्वीट करत भाजपला लक्ष केले. त्यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटले आहे की, ‘ भाजपने नाशिक पदवीधर मतदारसंघातून अधिकृत उमेदवार घोषित केला नाही. अखेरच्या क्षणापर्यंत एबी फॉर्मही कुणाला दिला गेला नाही. पाकळ्या मिटून घेण्याचं हे नवं ऑपरेशन कमळ म्हणावं का?’ असा टोला दिलीप वळसे-पाटील यांनी आपल्या ट्वीटच्या माध्यमातून भाजपला लगावला आहे.

 

दरम्यान, पत्रकारांशी संवाद साधताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील भाजपवर जोरदार टीका केली.
भाजपला आज दुसऱ्याचं घर फोडताना आनंद होत आहे.
मात्र जेव्हा त्यांचं घर फुटेल तेव्हा दुसऱ्याचं घर फोडल्याचं दु:ख काय असतं याची जाणीव त्यांना होईल असं पटोले
यांनी म्हटलं आहे.
तसचं काँग्रेस बंडखोरांना कधीही पाठिंबा देणार नाही, त्यामुळे आम्ही सत्यजित तांबे यांना समर्थन देणार नसल्याचं देखील पटोले यांनी स्पष्ट केलं आहे.
तसेच या प्रकरणाचा अहवाल हाय कमांडला पाठवला असून यावरचा निर्णय आता हाय कमांडकडून घेण्यात येईल असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, राजकीय वर्तुळात नाशिक पदवीधर मतदारसंघाची जोरदार चर्चा रंगली असून अर्ज सादर करण्याच्या
शेवटच्या दिवशी भाजपकडून काँग्रेस पक्षाला जोरदार धक्का देण्यात आला असल्याचे बोलले जात आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Dilip Walse-Patil | ncp leader dilip valse patil criticizes bjp

 

हे देखील वाचा :

Kirit Somaiya | महाविकास आघाडीतील नेत्यांनंतर मुंबई महापालिकेतील अधिकारी भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्या ‘रडार’वर

Pune Crime News | एटीएममधून पैसे न आल्याने गुगलवरुन केला संपर्क; सायबर चोरट्याने केले बँक खाते रिकामे

MP Navneet Rana | खासदार नवनीत राणांच्या कृषी महोत्सवावर पोलिसांची कारवाई, परिसरात तणाव

 

Related Posts