IMPIMP

Kirit Somaiya | महाविकास आघाडीतील नेत्यांनंतर मुंबई महापालिकेतील अधिकारी भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्या ‘रडार’वर

by nagesh
Kirit Somaiya | kirit somaiya allegation on bmc commissioner iqbal chahal and uddhav thackeray regarding covid decision

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या भाजप खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आता आपला मोर्चा मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांकडे वळवला आहे. कोरोना काळात उभारण्यात आलेल्या कोरोना केंद्रांत मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजप खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला होता. त्याबाबतची तक्रार त्यांनी आझाद मैदान पोलिस ठाण्यात दाखल केली होती. तसेच या सर्व प्रकरणाची चौकशी कॅगद्वारे केली जाणार आहे. असे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सांगण्यात आले होते. त्यातच आता मुंबई महापालिकेतील काही अधिकाऱ्यांना या प्रकरणात ईडीच्या नोटीशी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. कोल्हापूर येथे एका वृत्तवाहिनीशी बोलताना किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे आणि तत्कालिन मुंबई पोलिस आयुक्त यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

यावेळी बोलताना भाजप खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) म्हणाले की, ‘मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल, त्यांचे सरकारी आणि तत्कालिन सत्ताधाऱ्यांनी मुंबई महापालिकेतील घोटाळ्याची चौकशी होऊ नये, यासाठी अनेक प्रयत्न केले.
पण मी मुंबई महापालिका आयुक्तांना आव्हान दिलं होतं ही देशात लोकशाही आहे आणि याची चौकशी होणारच आहे.
त्याप्रमाणे चौकशी सुरू झाली आहे. सुरुवातीला करोना काळात ज्या कंपनीला कंत्राट मिळाले होते, त्याची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.
हळू हळू ऑक्सिजन प्लांट घोटाळा तसेच अस्लम शेख यांचे पत्र, आणि जे कोविड सेंटर कधी सुरूच नाही झालं,
त्याच्या देखभालीसाठी किशोरी पेडणेकर यांनी स्वत:च्या कंपनीला दिलेलं कंत्राट, यासर्वांची चौकशी होईल आणि करोना काळात जी काळी कमाई झाली आहे, त्याचा हिशोब आम्ही घेणारच.’
असा घणाघात यावेळी बोलताना किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्या तत्कालिन सरकारवर केला.

 

तसेच यावर पुढे बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर देखील गंभीर आरोप केले.
ते म्हणाले की, ‘उद्धव ठाकरे, त्यांचे सहकारी आणि मुंबई महापालिकेतील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांसाठी करोना हे
कमाईचं साधन होतं. जम्बो कोविड सेंटरमध्ये कोटींचा भ्रष्टाचार झाला.
याप्रकरणी मी आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली होती.
तसेच मुंबई पोलिसांनी २४ ऑगस्ट २०२२ रोजी गुन्हाही दाखल केला होता.
मात्र, त्यानंतर मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्लाब चहल यांनी १४० दिवस कोणतेही पेपर तपास यंत्रणांना दिले नाहीत. आता चार दिवसांपूर्वी त्यांनी मुंबई पोलिसांनी काही पेपर दिले आहेत.
असेही ते म्हणाले. तसेच, संजय राऊत यांचे सहकारी सुजित पाटकर यांच्या कंपनीला १०० कोटींचे कंत्राट मिळाले होते. त्यापैकी ३८ कोटींच्या पेमेंटचे मी पुरावे दिले आहे.
हा पैसा उद्धव ठाकरे यांच्या नेत्यांच्या बँक खात्यात गेला.’ असा आरोप त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Kirit Somaiya | kirit somaiya allegation on bmc commissioner iqbal chahal and uddhav thackeray regarding covid decision

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | एटीएममधून पैसे न आल्याने गुगलवरुन केला संपर्क; सायबर चोरट्याने केले बँक खाते रिकामे

MP Navneet Rana | खासदार नवनीत राणांच्या कृषी महोत्सवावर पोलिसांची कारवाई, परिसरात तणाव

Maharashtra Government | एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी ! शिंदे-फडणवीस सरकारने घेतला महत्वाचा निर्णय

 

Related Posts