IMPIMP

Punit Balan Group – Pune Rural Police | ‘पुनीत बालन ग्रुप’कडून पुणे ग्रामीण पोलिसांना तीन हजार जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप

by nagesh
Distribution of 3000 kits of essential items to Pune Rural Police from Punit Balan Group

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन –  Punit Balan Group – Pune Rural Police | संत ज्ञानेश्वर महाराज (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala 2023) आणि संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala 2023) यांच्या पालखी सोहळ्यात सुरक्षा व्यवस्था पुरविणाऱ्या पुणे ग्रामीण पोलिस बांधवांना ‘पुनीत बालन ग्रुप’कडून तीन हजार जीवनावश्यक वस्तूंच्या किट (Essentials Kits For Police) देण्यात आल्या आहेत. यामुळे बंदोबस्तावर असताना पोलिसांची गैरसोय दूर झाली आहे. (Punit Balan Group – Pune Rural Police)

युवा उद्योजक पुनीत बालन (Entrepreneur Punit Balan) यांनी आषाढी वारीसाठी पंढरपुरात बंदोबस्तासाठी (Pandharpur Ashadhi Wari Police Bandobast) येणाऱ्या पोलिस बांधवांना ५ हजार किटचे वाटप केले आहे. दरम्यान संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुणे जिल्ह्यातून (Pune District) जाताना मोठ्या संख्येने पोलिस कर्मचारी सुरक्षितेसाठी रस्त्यांवर असतात. या कर्मचाऱ्यांनाही या कालावधीत जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात यासाठी पुनीत बालन यांनी तब्बल तीन हजार कर्मचाऱ्यांना हे जीवनाश्यक वस्तूंचे किट पुरवण्याची व्यवस्था केली आहे. तसेच सध्या उन्हाची तीव्रता असल्याने पिण्याच्या पाण्याचे तीन हजार बॉक्सही देण्यात आले. पुणे ग्रामीणचे पोलिस निरीक्षक मुजावर (Police Inspector Mujawer) यांच्याकडे पुनीत बालन यांनी या वस्तूंचे किट सुपुर्द केले. ‘बालन ग्रुप’कडून करण्यात आलेल्या या सहकार्याबद्दल मुजावर यांनी त्यांचे आभार मानले. यावेळी पुनीत बालन यांनी वारकऱ्यांच्या सेवेत असलेल्या पोलिस बांधवांसाठी सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल असे आश्वासन दिले.

किटमध्य असलेल्या वस्तू

या किटमध्ये प्रामुख्याने कोलगेट, टूथ ब्रश, ग्लुकोज-डी, बिस्कीट पाकीट, चिक्की पाकीट, पाण्याची बाटली, हँडवॉश, शेविंगकिट,
तेलाची बाटली, मास्क, सॅनीटायझर, साबण, ऑडोमास, सॅनिटरी नेपकीन या दैनदिन वापरातील वस्तूंचा समावेश आहे.

Web Title : Distribution of 3000 kits of essential items to Pune Rural Police from Punit Balan Group

Related Posts