IMPIMP

डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या तपासावर हायकोर्टाचे ताशेरे; ‘आणखी किती काळ तुमचा तपास सुरू राहणार?’

by bali123
dr. narendra dabholkar govind pansare death high court warns investigating agencies

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर dr. narendra dabholkar आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणाचा तपास अद्याप सुरूच आहे. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने तपास यंत्रणांच्या तपासावर ताशेरे ओढले आहेत. ‘आणखी किती काळ तुमचा तपास सुरू राहणार?’ असे न्यायालयाने म्हटले आहे.

डॉ. दाभोलकर dr. narendra dabholkar यांच्या हत्येला 8 वर्षे, तर कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येला 6 वर्षे झाली आहेत. मात्र, या प्रकरणाचा तपास अद्याप सुरूच आहे. त्यावर न्यायालयाने तपास यंत्रणांना खडे बोल सुनावले आहेत. न्यायालयाने म्हटले, की असा आणखी किती काळ तुमचा तपास सुरू राहणार? कर्नाटक राज्यात त्यानंतर झालेल्या विचारवंतांच्या हत्या प्रकरणात खटलाही सुरू झाला असेल. मात्र, आपल्या इथे राज्यात अजून खटले सुरू का झाले नाहीत? अशा संवेदनशील प्रकरणांत तपास गांभीर्याने होतोय आणि खटलाही चालवला जातोय, असा संदेश लोकांमध्ये जाणेही आवश्यक आहे. अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, याची खबरदारी घेणेही गरजेचे आहे.

…तर जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई
आम्ही सीबीआय आणि एसआयटी या दोन्ही तपास यंत्रणांच्या कामाविषयी शंका घेत नाही. मात्र, त्यांचे तपासात प्रामाणिकपणे प्रयत्न सुरू असल्याचे दिसले पाहिजे. नाहीतर जबाबदार अधिकाऱ्यांपैकी कोणालाही सोडणार नाही, असा इशारा न्यायालयाने दिला आहे.

पोलिस अधिकार्‍याशी बोलताना माजी मंत्र्याची जीभ घसरली, म्हणाले – ‘तुम्ही सरकारचे कुत्रे झाले’

वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझेंची नागरी सुविधा केंद्रात बदली

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी ATS चे ‘क्राइम सीन’ प्रात्याक्षिक

21 तारखेला परीक्षा न झाल्यास पुन्हा आंदोलन करणार; गोपीचंद पडळकरांचा राज्य सरकारला इशारा

Birthday SPL : ‘या’ शोमुळं बदललं होतं ‘सिंगर’ श्रेया घोषालचं आयुष्य ! 6 वर्षांनंतर होतेय आई

Related Posts