IMPIMP

पोलिस अधिकार्‍याशी बोलताना माजी मंत्र्याची जीभ घसरली, म्हणाले – ‘तुम्ही सरकारचे कुत्रे झाले’

by pranjalishirish
mpsc-students-protest-against-government-clashes-between-bjp-anil-bonde-and-police-amravati

अमरावती : सरकारसत्ता ऑनलाइन – महाराष्ट्र सरकारने MPSC परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला तेव्हा विद्यार्थ्यांनी यावर संताप व्यक्त करत ठिकठिकाणी आंदोलने केले. पुण्यात सुरू झालेलं आंदोलन राज्यभरात पोहाेचले. यामध्ये अमरावती येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. अमरावती येथील विद्यार्थ्यांना पोलिसांनी कॉलर पकडून जबरदस्तीने व्हॅनमध्ये बसवले. त्यामुळे माजी मंत्री अनिल बोंडे Anil Bonde आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली.

या आंदोलनामध्ये अनिल बोंडे Anil Bonde आणि पोलीस यांच्यात शाब्दिक चकमक उडाल्याचे पाहायला मिळाले.आम्ही सरकारकडे मागणी करतोय, तुमच्याकडे नाही, तर तुम्ही आंदोलन केलंय त्यावर आम्हाला नियंत्रण आणावं लागेल, तुम्ही आम्हाला शहाणपणा कसा शिकवता? असा प्रश्न पोलिसांनी केला. यावर अनिल बोंडे Anil Bonde यांनी एवढ्या मुला-मुलींना तुम्ही आतमध्ये कोंडलं, तुम्हाला समजत नाही का? असा प्रतिप्रश्नदेखील केला. पोलीस अधिकारी आणि अनिल बोंडे यांच्यातील शाब्दिक युद्ध वाढत असतानाच बोंडे Anil Bonde  यांनी तुम्ही सरकारचे कुत्रे आहात म्हणून हिणवलं, त्यावर संतप्त अधिकाऱ्यानेही तुम्ही पण कुत्रेच असल्याचं प्रत्युत्तर दिलं, यानंतर पोलिसांनी अनिल बोंडे यांना ताब्यात घेतले आहे.

नेमकं काय घडलं?
आंदोलक विद्यार्थ्यांना पोलीस व्हॅनमधून बाहेर काढण्यासाठी पुढे आलेल्या माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांना एका पोलीस उपनिरीक्षकांनी विरोध केला. विद्यार्थी हे स्वत:च्या हक्कासाठी लढा देत आहेत, असे बोंडे Anil Bonde म्हणाले होते. मात्र, कोरोनाकाळात आंदोलन करता येत नाही, सरकारकडे मागणी करा, असे ठाणेदार चोरमले म्हणाले होते. संयमाने बोला, संयम शिकवू नका, असे बोंडे यांनी चोरमले यांना प्रत्युत्तर दिले. मुलींना पोलीस व्हॅनमधून कोंबून नेता. महिला पोलीस सोबत नाही, त्या काही चोर नाहीत, असा मुद्दादेखील बोंडे यांनी उपस्थित केला. चोरमले तुम्हाला नोकरी मिळाली म्हणून झाले का, असेसुद्धा बोंडे म्हणाले. आंदोलकांना संधी दिली आहे, चोरमले यांनी सांगितले. तेव्हा बोंडे यांनी संतापाच्या भरात तुम्ही सरकारचे कुत्रे झाले’ असे दोन वेळा म्हणाले. यावेळी बोंडे व चोरमले यांच्यातील वाद अजून वाढला. त्यानंतर चोरमले यांनी बोंडे यांनाच ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर त्यांना पोलीस वाहनातून आयुक्तालयात नेण्यात आले.

Alos Read :

वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझेंची नागरी सुविधा केंद्रात बदली

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी ATS चे ‘क्राइम सीन’ प्रात्याक्षिक

MPSC Exam Postpond : अजित पवारांनी मांडलं स्पष्ट मत; म्हणाले – ‘MPSC प्रकरण हाताळण्यात कमी पडलं’

21 तारखेला परीक्षा न झाल्यास पुन्हा आंदोलन करणार; गोपीचंद पडळकरांचा राज्य सरकारला इशारा

Birthday SPL : ‘या’ शोमुळं बदललं होतं ‘सिंगर’ श्रेया घोषालचं आयुष्य ! 6 वर्षांनंतर होतेय आई

Related Posts