IMPIMP

Dr Sanjeev Thakur-Sassoon Hospital | अखेर वादग्रस्त ससूनचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांना अधिष्ठातापदावरुन हटवलं, उच्च न्यायालयाचा निकाल

by sachinsitapure
Dr Sanjeev Thakur-Sassoon Hospital

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Dr Sanjeev Thakur-Sassoon Hospital | ड्रग्स माफिया ललित पाटील (Drug Mafia Lalit Patil) प्रकरणामुळे चर्चेत आलेले ससून हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. संजय ठाकूर (Dr Sanjeev Thakur-Sassoon Hospital) यांना पदावरुन हटवण्यात आले आहे. उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) हा निकाल दिला आहे. पूर्वीचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे (Dr Vinayak Kale) यांची मध्यावधी बदली करण्यात आली होती. त्या विरोधात त्यांनी मॅटमध्ये दावा दाखल केला होता. मॅटने डॉ. काळे यांच्या बाजूने निकाल दिला आहे. परंतु, त्या विरोधात डॉ. ठाकूर यांनी उच्च न्यायालयाकडे दाद मागितली होती. त्याचा निकाल आज (शुक्रवार) दिला आहे. त्यामध्ये पुन्हा अधिष्ठातापदी डॉ. काळे यांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत. (Pune Drug Case)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

बीजे वैद्यकीय महाविद्यालय तथा ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांची जानेवारी महिन्यात तडकाफडकी बदली केली होती. ससून रुग्णालयातील महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेच्या संचालकपदी त्यांची नियुक्ती केली होती. तर डॉ. संजीव ठाकुर यांची ससूनच्या अधिष्ठातापदी नियुक्त करण्यात आली होती. ते सोलापूरच्या डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठातपदी कार्यरत होते. (Dr Sanjeev Thakur-Sassoon Hospital)

डॉ. विनायक काळे हे जे.जे. रुग्णालयातील उप अधिष्ठाता पदावरून पदोन्नतीने दीड वर्षापूर्वी ससूनच्या अधिष्ठातापदी
रुजू झाले होते. मात्र, तीन वर्षांच्या आतच त्यांची बदली करण्यात आली. डॉ. ठाकूर यापूर्वी ससून हॉस्पिटलमध्ये
सर्जरी विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. त्या विरोधात काळे यांनी मॅटमध्ये दावा दाखल केला होता.
मॅटने डॉ. काळे यांच्या बाजूने निकाल दिला. परंतु, त्याविरोधात डॉ. संजीव ठाकुर यांनी मुंबई उच्च न्यायालयात
दाद मागितली होती. त्याचा निकाल आज न्यायालयाने दिला. त्यात पुन्हा डॉ. काळे यांना अधिष्ठातापदी नियुक्त
करण्याचे आदेश दिले आहेत. (Sassoon Drug Case)

Related Posts