IMPIMP

Dream Girl 2 Teaser | बहुचर्चित ‘ड्रीम गर्ल 2’ चा टीझर रिलीज

by nagesh
Dream Girl 2 Teaser | ayushmann khurrana is back with dream girl 2 teaser pooja talking to pathaan

सरकारसत्ता ऑनलाईन – Dream Girl 2 Teaser | बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना याचा ‘ड्रीम गर्ल’ हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये आयुष्मानने धडाकेबाज अभिनय केला. आता लवकरच चाहत्यांच्या भेटीला ‘ड्रीम गर्ल-2’ (Dream Girl 2 Teaser) येणार आहे. आता आयुष्मान पुन्हा या चित्रपटाच्या निमित्ताने पूजाच्या भूमिकेत परत येत आहे. या चित्रपटात आयुषमानसोबतच अनन्या पांडे, परेश रावल, राजपाल यादव, असरानी, विजय राज, मनोज जोशी, सीमा पाहवा, अभिषेक बॅनर्जी आणि मनज्योत सिंह यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहेत. या चितपटाचे दिग्दर्शक राज शांडिल्य हे असून एकता कपूर यांनी या चित्रपटाची निर्माती केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

‘ड्रीम गर्ल 2’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘ड्रीम गर्ल-2 ‘ च्या टीझरमध्ये  आयुष्मान खुराना किंवा कोणत्याही अभिनेत्याचा चेहरा दाखवण्यात आलेला नाही, मात्र त्याचा आवाज आणि त्याची छोटीशी झलक पाहिल्यानंतर तो आयुष्मानच आहे हे स्पष्ट होते. टीझरवरून दिसतयं की पूजा आता कॉल सेंटरमध्ये नसून लेहेंगा-चोली घालून बेडवर बसलेली दिसते. तितक्यात तिचा फोन वाजतो. त्यांनतर ती पठाणसोबत म्हणजेच शाहरुख खानसोबत फोनवर बोलताना दिसत आहे.

 

 

‘पूजा’ आणि ‘पठाण’ यांच्यातील खोडसर चर्चाही या टिझरमध्ये ऐकायला मिळात आहे. पूजाचा फोन वाजतो आणि ती फोन रिसिव्ह करून बोलते, “हॅलो, मी पूजा बोलतेय, तुम्ही कोण?” त्यावर पलिकडून शाहरुखचा आवाज येतो, “पूजा, मी पठाण बोलतोय .” हे ऐकून पूजा म्हणते, “उफ्फ, कसा आहे माझा पठाण.” तर शाहरुख तिला म्हणतो, “आधीपेक्षा जास्त श्रीमंत “आणि तिला व्हेलेंटाईन्स डे च्या शुभेच्छा देतो. यानंतर पुढे त्यांचं काय बोलणं होतं हे पाहण्यासाठी तुम्हाला हा टीझर पाहावाच लागेल. या चित्रपटाच्या टीझरसोबतच निर्मात्यांनी ‘ड्रीम गर्ल 2’ ची रिलीज डेटही जाहीर केली आहे. ‘ड्रीम गर्ल 2’ हा चित्रपट 7 जुलै 2023 ला म्हणजे शाहरुख खानच्या जवान चित्रपटाबरोबरच प्रदर्शित होणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Dream Girl 2 Teaser | ayushmann khurrana is back with dream girl 2 teaser pooja talking to pathaan

 

हे देखील वाचा :

Kirit Somaiya | किरीट सोमय्यांच्या ‘त्या’ ट्वीटने पुन्हा खळबळ; म्हणाले – ‘अब नंबर किस का?’

Pune Crime News | पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, केटरिंगचे काम करण्याऱ्या पाच महिलांचा मृत्यू; 13 गंभीर जखमी

Beed Crime News | आजीने चप्पल घेण्यास नकार दिल्याने 10 वर्षीय नातवाने उचलले ‘हे’ पाऊल

 

Related Posts