IMPIMP

Beed Crime News | आजीने चप्पल घेण्यास नकार दिल्याने 10 वर्षीय नातवाने उचलले ‘हे’ पाऊल

by nagesh
Pune Crime News | Pune Crime News: Hadapsar Police Station - Woman killed and body dumped in a well

बीड  : सरकारसत्ता ऑनलाईन   Beed Crime News | बीडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये नवीन चप्पल खरेदी करुन दिली नाही, म्हणून चक्क एका 10 वर्षीय मुलाने आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हि धक्कादायक घटना बीडमधील कासारी बोडखा याठिकाणी घडली आहे. यामध्ये 10 वर्षीय नातवाने आजीने नवीन चप्पल घेतली नाही, याचा राग आल्याने कोणताही मागचा पुढचा विचार न करता थेट टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. (Beed Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काय आहे नेमके प्रकरण?
या बालकाचे आई-वडील ऊसतोड मजूर आहेत. तो आपल्या आजोळी हिंगणी खुर्द येथील विश्वनाथ काशिनाथ उजगरे यांच्याकडे आला होता. यावेळी त्याने आपल्याला नवीन चप्पल पाहिजे म्हणून आजीला सांगितले. मात्र, आजीने चप्पल घेण्यास नकार दिला. याचा त्याला राग आला. यानंतर तो “मी माझ्या आई-वडिलांकडे जातो”, असं म्हणून घराबाहेर पडला. त्यानंतर त्याने गावाजवळच असलेल्या एका झाडाला साडीने गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला. ऊस तोडणीला गेलेल्या आई-वडिलांना आपल्या मुलाची घटना कळताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली त्यांना मोठा धक्का बसला. (Beed Crime News)

 

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृत चिमुकल्याचा मृतदेह धारूर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. त्याने एका क्षुल्लक कारणावरून आत्महत्या केल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. पोरांनी एखाद्या गोष्टीचा हट्ट धरला आणि पालकांनी तो पूर्ण नाही केला तर त्याचे काय परिणाम होतात याची प्रचिती तुम्हाला या घटनेतून येईल.

 

 

Web Title :- Beed Crime News | in beed kasari bodkha not given slipper child ended his life

 

हे देखील वाचा :

Balasaheb Thorat | राधाकृष्ण विखेंच्या टीकेला बाळासाहेब थोरात यांचे प्रत्युत्तर; म्हणाले…

Pune Crime News | 74 वर्षाच्या पत्नीने 78 वर्षाच्या पतीविरुद्ध केली फसवणुकीची तक्रार; शिवाजीनगर पोलीस ठाण्यात FIR

Pune Weather News | पुण्यात पुन्हा वाढला गारठा; किमान तापमान गेले सिंगल डिजिटमध्ये, आल्हाददायक वातावरणाचा अनुभव

 

Related Posts