IMPIMP

Eknath Shinde | CM उद्धव ठाकरेंनी आमदारांना शिंदे गटाकडे पाठवलंय?; एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

by nagesh
CM Eknath Shinde | cm eknath shinde on question of cabinet expansion in maharashtra after delhi visit

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Eknath Shinde | राज्यातील सत्ता संघर्षाला आता वेग आला आहे. बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पक्षाविरोधात बंड पुकारलं. त्यामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. दिवसेंदिवस अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. सध्या शिंदे गट आसाममधील गुवाहाटी (Guwahati) येथे असून जवळपास चाळीसहून अधिक आमदार एकनाथ शिंदेकडे असल्याचे सांगितलं जातेय. यामुळे शिवसेनेला (Shivsena) मोठा धक्का बसला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडामुळे महाविकास आघाडी सरकारचं (Mahavikas Aghadi Sarkar) अस्तित्व धोक्यात आलं आहे. दरम्यान, हा उद्धव ठाकरेंचाच (Uddhav Thackeray) प्लान असून त्यांनीच आमदारांना बंड करण्यास सांगितलं आहे. तसेच, शिंदे गटाकडे एकापाठोपाठ एक आमदारांचं जाणं हाही त्याचाच भाग आहे. अशी चर्चा असल्याचं बोललं जात आहे. याबाबत एकनाथ शिंदेंना विचारलं असता त्यांनी स्पष्ट उत्तर दिलं आहे.

ही एकच शिवसेना आहे. हा उद्धव ठाकरेंचा मास्टर स्ट्रोक आहे. त्यांनीच एक मोठा गट तुमच्याकडे पाठवला आहे? याबाबत विचारलं असता, “मला याबाबत काही माहीत नाही.” असं उत्तर एकनाथ शिंदेंनी दिलं आहे.

‘बाहेर गेलेल्या आमदारांना परत यावंच लागेल,’ असं शरद पवार (Sharad Pawar) यांच्या विधानावर एकनाथ शिंदे म्हणाले, “शरद पवार देशातील मोठे नेते आहेत. आम्ही त्यांचा आदर करतो. पण लोकशाहीत शेवटी आकडे महत्त्वाचे असतात. लोकशाहीत कायद्याप्रमाणे, नियमाप्रमाणे जे आहे, तेच करावं लागतं. त्यामुळे मला याबद्दल जास्त बोलायची गरज नाही. नियमाप्रमाणे, कायद्याप्रमाणे आमची बाजू भक्कम असल्याचे,” ते म्हणाले. तसेच, “बहुमतासाठी आवश्यक असणारा आकडा पूर्ण झाला आहे,” असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

 

Web Title :- Eknath Shinde | shivsena leader eknath shinde on cm uddhav thackeray maharashtra political crisis

 

हे देखील वाचा :

Bhaskar Jadhav | ‘मी नॉट रिचेबल नव्हतोच’ ! भास्कर जाधवांचा अखेर ठावठिकाणा कळला

Pune Crime | लक्झरी बसमधून विदेशी दारुची बेकायदा वाहतूक ! राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून बससह 80 लाखांचा मुद्देमाल जप्त

Uddhav Thackeray vs Eknath Shinde | ‘आदित्यला विठ्ठलाभोवतीचा बडवा म्हणता, मग स्वत:चा मुलगा खासदार, हे कसं चालतं?’ – CM उद्धव ठाकरे

 

Related Posts