IMPIMP

EPFO Interest Rate | कोट्यवधी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारकडून मोठं गिफ्ट! PF वरील व्याज दर वाढवला

by nagesh
EPFO Interest Rate | modi governments big gift to 65 crore people announcement of increase in interest on pf

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्मचारी भविष्य निर्वाह निधीने (Employees Provident Fund) कोट्यवधी कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. ईपीएफओने PF मधील ठेवींवरील व्याजदरात (EPFO Interest Rate) वाढ केली आहे. EPFO चा प्रस्ताव स्वीकारत वित्त मंत्रालयाने (Ministry of Finance) PF वर आर्थिक वर्ष 2023 साठी 8.15 टक्के व्याजदर मंजूर (EPFO Interest Rate) केला आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये आता PF खातेदाराला 8.15 टक्के दराने व्याज मिळणार आहे. यापूर्वी मार्चमध्ये 2021-22 साठी EPF वरील व्याजदर 8.10 टक्का होता.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

ईपीएफओ जारी केलेल्या एका नोटिफिकेशनमध्ये म्हटले आहे की, भारत सरकारच्या (Government of India) श्रम
आणि रोजगार मंत्रालयाने ईपीएफ योजनेतील प्रत्येक सदस्याच्या खात्यात 2022-23 वर्षासाठीचे व्याज
(EPFO Interest Rate) जमा करण्यासाठी कर्मचारी भविष्य निधी योजना, 1952 च्या पॅरा 60 (1) अंतर्गत
केंद्र सरकारने (Central Government) मंजुरी दिली आहे.

ईपीएफओ खात्यावर मिळणाऱ्या व्याजदर वाढीच्या घोषणेनंतर, संबंधित सर्क्युलर सोमवारी (दि.24) जारी करण्यात आले आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाहनिधी संघटनेच्या बोर्डाने आर्थिक वर्ष 2022-23 साठी EPF Account वर 8.15 टक्के व्याज निश्चित केले होते आणि मंजुरीसाठी अर्थमंत्रालयाकडे पाठवले होते.
साधारणपणे, व्याजाचे पैसे ऑगस्ट 2023 पर्यंत खात्यात जमा होतील.

कर्मचारी भविष्य निर्वाही निधी संघटनेकडून जारी केलेल्या सर्क्युलरनुसार, यंदाच्या वर्षी मार्च 2023 मध्ये बोर्डाने व्याजदर
8.10 टक्क्यांवरुन 8.15 टक्के करण्यात यावा, असा प्रस्ताव दिला होता.
त्यानुसार, सीबीटी च्या शिफारशीनंतर अर्थमंत्रालयाकडून व्याजदर नोटिफाय केला जातो.
यानंतर तो EPFO मेंबरच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो.

Web Title : EPFO Interest Rate | modi governments big gift to 65 crore people announcement of increase in interest on pf


हे देखील वाचा

Pune Crime News | स्वारगेट चौकात व्यावसायिकावर फायरिंग करणार्‍या मुख्य आरोपींना क्राईम ब्रँचकडून
अटक ! 2 पिस्तुलासह 31 जिवंत काडतुसे अन् साडेतीन लाखाची रोकड जप्त (Video)

Related Posts