IMPIMP

EPFO NEWS | Private Sector मधील कर्मचार्‍यांना सुद्धा सेवानिवृत्तीच्या दिवसापासनूच मिळणार पेन्शन

by nagesh
EPFO NEWS | private sector employees also get pension from the day of retirement

नवी दिल्ली :वृत्तसंस्था EPFO NEWS | केंद्र सरकार खासगी क्षेत्रातील कर्मचार्‍यांचा (Private Sector Worker) त्रास कमी करण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. खासगी आस्थापना आणि संस्थांमधील कर्मचार्‍यांनाही नजीकच्या काळात सरकारी कर्मचार्‍यांप्रमाणे निवृत्ती दिवसापासून पेन्शन मिळणार आहे. यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) शुक्रवारी लुधियानामध्ये ’विश्वास’ हा पायलट प्रोजेक्ट सुरू केला आहे. (EPFO NEWS)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

ही आहे प्रक्रिया

प्रकल्पांतर्गत लुधियाना येथील क्षेत्रीय कार्यालयात एक विशेष टीम तयार करण्यात आली आहे. ही टीम कर्मचार्‍यांची कागदपत्रे सेवानिवृत्तीच्या दोन महिने अगोदर पूर्ण करेल, त्यामुळे त्यांना निवृत्तीनंतर पेन्शन प्रमाणपत्र दिली जाईल. (EPFO NEWS)

 

54 आस्थापनातील 91 कर्मचार्‍यांना दिले पेन्शन प्रमाणपत्र

शुक्रवारी एप्रिलमध्ये सेवानिवृत्त होणार्‍या 54 आस्थापनांतील 91 कर्मचार्‍यांना पेन्शन प्रमाणपत्र देण्यात आले. यापैकी सात जणांनी डिफर्ड पेन्शनचा पर्याय निवडला आहे, तर 84 जणांनी पेन्शनचा पर्याय निवडला आहे. हा प्रयत्न यशस्वी झाल्यानंतर इतर राज्यातही सुरू केला जाईल.

 

आगाऊ भरावे लागेल निवृत्तीच्या महिन्याचे योगदान

ईपीएफओचे अतिरिक्त केंद्रीय आयुक्त (एसीसी) कुमार रोहित म्हणाले की, आस्थापनांना निवृत्तीच्या महिन्यासाठी भविष्य निर्वाह निधी (पीएफ) चे आगाऊ पेमेंट करावे लागेल. पेन्शनचे दावे पीएफ कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह दाखल करावे लागतात. महिन्याच्या 15 तारखेपूर्वी सेवानिवृत्त होणार्‍या कर्मचार्‍यांना ईसीआर (इलेक्ट्रॉनिक चलन कम रिटर्न) भरावे लागेल.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

‘प्रयास’ ते ‘विश्वास’ मध्ये क्रांतिकारी बदल

यादरम्यान, ईपीएफओचे अतिरिक्त केंद्रीय आयुक्त (एसीसी) कुमार रोहित म्हणाले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात ‘प्रयास’ ते ‘विश्वास’ या दृष्टिकोनात क्रांतिकारक बदल होत आहे.

 

पायलट प्रोजेक्ट लुधियानामध्ये सुरू

ते म्हणाले की ईपीएफओमध्ये हे पहिल्यांदाच केले जात आहे,
त्यामुळे व्यावहारिक समस्या समजून घेण्यासाठी लुधियानामध्ये एक पायलट प्रोजेक्ट सुरू करण्यात आला आहे.
त्यानंतर इतर ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे.

 

Web Title :- EPFO NEWS | private sector employees also get pension from the day of retirement

 

हे देखील वाचा :

Vidya Chavan | राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदी विद्या चव्हाण यांची नियुक्ती; जाणून घ्या विभागनिहाय राष्ट्रवादी महिला अध्यक्षा

BJP on Uddhav Thackeray | सचिन वाझे प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांवर भाजपचे गंभीर आरोप

Heat Wave-Weather Department | गेल्या 122 वर्षांत यंदाचा एप्रिल सर्वाधिक उष्ण

 

Related Posts