IMPIMP

FIFA World Cup 2022 | घानाविरुद्धच्या सामन्यात रोनाल्डोने गोल करताच ‘हा’ विश्वविक्रम होणार त्याच्या नावावर

by nagesh
FIFA World Cup 2022 | fifa world cup 2022 ronaldo will set a world record in the match against ghana will create history as soon as he scores a goal

सरकारसत्ता ऑनलाईन : सध्या FIFA World Cup 2022 सुरु आहे. आज घाना आणि पोर्तुगाल यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यात सगळ्या फ़ुटबॉलप्रेमींच्या नजरा या सुपरस्टार फॉरवर्ड क्रिस्टियानो रोनाल्डोवर असतील. कारण रोनाल्डोने घानाविरुद्ध गोल केल्यास पाच वेगवेगळ्या विश्वचषकांमध्ये गोल करणारा तो पहिला खेळाडू ठरणार आहे. 37 वर्षीय रोनाल्डो आपला पाचवा आणि कदाचित शेवटचा विश्वचषक खेळत आहे.

 

प्रशिक्षक फर्नांडो सँटोसच्या पोर्तुगीज संघात आक्रमण आणि मिडफिल्ड खूप ताकदवान आहे. 2016 मध्ये युरोपियन चॅम्पियनशिपचे विजेतेपद त्यांनी जिंकले होते. सध्या रोनाल्डो मँचेस्टर युनायटेड यांच्यात वाद सुरु आहे.
यामुळे वादाचा संघाच्या विश्वचषक मोहिमेवर कोणताही परिणाम होणार नाही, असे रोनाल्डोने म्हटले आहे.
रोनाल्डोला अद्याप विश्वचषक जिंकता आलेला नाही आणि प्रथमच ट्रॉफी मिळवणे हे या विश्वचषकातील त्याचे प्रेरणास्थान असणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पोर्तुगाल आणि घाना यांच्यात आतापर्यंत दोन सामने झाले आहेत. यातील एक सामना पोर्तुगालने जिंकला,
तर दुसरा सामना अनिर्णित राहिला आहे. अशा परिस्थितीत घाना संघाला रोनाल्डोच्या संघाचा पराभव करून
विश्वचषक मोहिमेची विजयी सुरुवात करायची आहे. क्रिस्टियानो रोनाल्डोचा हा शेवटचा विश्वचषक आहे.
त्यामुळे तो यंदाच्या वर्ल्डकपमध्ये संघाला ट्रॉफी मिळवून देतो का ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

 

Web Title :- FIFA World Cup 2022 | fifa world cup 2022 ronaldo will set a world record in the match against ghana will create history as soon as he scores a goal

 

हे देखील वाचा :

Raj Thackeray | राज ठाकरे करणार कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचा दौरा; मनसेने केला तपशील जाहीर

Shailesh Lodha | शैलेश लोढा यांनी फोटो शेअर करत विकी कौशलसाठी लिहिली खास पोस्ट

Amit Shah On Shraddha Walker Murder Case | ‘ज्याने कोणी श्रद्धा वालकरची हत्या केली असेल त्याला कठोर शिक्षा होईल’; गृहमंत्री अमित शाह यांचे आश्वासन

 

Related Posts