IMPIMP

Ganeshotsav 2022 | बाप्पा पावला ! गणेशोत्सव आणि दहीहंडीच्या निर्बंधाबाबत शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा दिलासादायक निर्णय

by nagesh
Pune Ganeshotsav 2022 | There is no plan to release water from the dam for Ganesh Visarjan this year - a statement from the Water Resources Department

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन कोरोनामुळे (Corona) गेल्या दोन वर्षापासून ब्रेक लागलेल्या दहीहंडी (Dahihandi) आणि गणेशोत्सवाला (Ganeshotsav 2022 ) यंदा हिरवा कंदील मिळाला आहे. कोरोना निर्बंधाच्या विघ्नात अकडलेली दहीहंडी, गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होणार आहे. यंदा गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) आणि दहीहंडी उत्सव निर्बंधमुक्त साजरे करण्याची घोषणा राज्य सरकारने (State Government) केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना याबाबतची माहिती दिली.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) आणि दहीहंडीसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आज अतिशय महत्वाची बैठक झाली. गेली दोन वर्षे कोरोनामुळे सर्व सण उत्सवांवर मर्यादा होत्या. निर्बंध होते. इच्छा असूनही उत्सव साजरे करता आले नाहीत. यावर्षी मात्र सर्व मंडळांचा उत्साह आणि गेल्या दोन वर्षांतील मर्यादा पाहता यावर्षी गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्र (Navratri) उत्साहात साजरे झाले पाहिजेत, असा कल दिसून आला. त्यामुळे यावर्षी सर्व उत्सव निर्बंधाविना साजरे होतील. कायदा सुव्यवस्था (Law and Order) राखून हे सण साजरे व्हावेत, यासाठी पोलिसांना (Maharashtra Police) सूचना दिल्या आहेत, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

 

गणेश मंडळांना शुल्क आकारणार नाही

गणेशोत्सवापूर्वी सर्व मार्गांवरील खड्डे बुजवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच मंडपाच्या परवानग्या सुटसुटीत झाल्या पाहिजेत. यासाठी एक खिडकी योजना, ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया सुटसुटीत करण्यात आल्या आहे. गणेश मंडळांना (Ganesha Mandal) नोंदणीसाठी शुल्क आकारण्यात येणार नाही. कोरोनामुळे उंचीवर मर्यादा घालण्यात आली होती. मात्र ही मर्यादा काढून टाकण्यात आली आहे, अशी घोषणा ही मुख्यमंत्र्यांनी केली.

 

राज्यात नवे सरकार आल्यापासून हा दुसरा मोठा निर्णय आहे. या आगोदर शिंदे सरकारने पेट्रोल,
डिझेलच्या दरावरील व्हॅट कमी (Petrol, Diesel VAT Less) करण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयामुळे राज्यात पेट्रोल 5 रुपये तर डिझेल 3 रुपये प्रति लिटरने स्वस्त झाले.
आज आरे कारशेड वरील (Aarey Car Shed) स्थगिती मुख्यमंत्र्यांनी उठवली. ठाकरे सरकारने हे काम थांबवलं होतं.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Ganeshotsav 2022 | dahihandi ganeshotsav this year in a frenzy chief minister eknath shindes big announcement about restrictions

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | अजितदादा पवार हे शिस्तप्रिय, प्रशासनावर मजबूत पकड असणारे, रोखठोक स्वभावाचे नेते

Pune Crime | सायकलवर फिरण्यासाठी जाणाऱ्या नागरिकाचा मोबाईल चोरणारा गुन्हे शाखेकडून गजाआड, iPhone जप्त

Aaditya Thackeray | केदार दिघेंच्या उपस्थिती आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरासमोर शिवसैनिकांशी साधला संवाद

 

Related Posts