IMPIMP

Gautami Patil | सांगलीत झालेल्या घटनेनंतर गौतमी पाटीलनी पत्रकार परिषद घेत केला ‘हा’ मोठा खुलासा (VIDEO)

by nagesh
Gautami Patil | gautami patil press conference about sangli program controversy

सरकारसत्ता ऑनलाईन  –  सांगली (Sangli) जिल्ह्यातील बेडग येथे कार्यक्रमात झालेल्या घटनेमुळे गौतमी पाटील (Gautami Patil) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गौतमी पाटीलचा (Gautami Patil) बेडगमध्ये कार्यक्रम पार पडला होता. यावेळी तिचा कार्यक्रम पाहण्यासाठी लोकांनी एवढी गर्दी केली होती की या गर्दीत एकाचा मृतदेह आढळून आला. या संपूर्ण घटनेनंतर गौतमीने आपले मत मांडण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करून काही गोष्टींचा खुलासा केला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

या पत्रकार परिषदेत गौतमी म्हणाली, “बेडग येथे कार्यक्रमासाठी मला नेहमीप्रमाणे बोलवण्यात आले आणि मी जाऊन कार्यक्रम केला. या कार्यक्रमाला खूपच गर्दी दिसून आली. मात्र त्यात असे काही घडले हे आम्हालाही कळाले नाही. जेव्हा आम्हाला ही गोष्ट कळाली तेव्हा आम्हालाही धक्का बसला आणि वाईट देखील वाटले. एवढेच नाही तर या कार्यक्रमात झाड देखील कोसळले होते. अक्षरच्या झाड खाली पडल्यावर लोकांनी झाडाच्या काट्याही आम्हाला फेकून मारल्या.”

 

 

गौतमीला (Gautami Patil) तिच्या अश्लील डान्स वरून विचारले असता ती म्हणाली,
“हो माझ्याकडून चूक झाली डान्स करण्याच्या फ्लो मध्ये मी काही स्टेप्स चुकीचे केले.
याबद्दल मी वारंवार instagram सगळ्यांची माफी मागितली इथे पुन्हा एकदा मी त्याबद्दल सगळ्यांची माफी मागत
आहे. माझं नक्की काय चुकत होते हे मला सुरेखा ताईंनी (Surekha Punekar) समजावले तेव्हा मला कळाले.
तेव्हापासून मी पुन्हा ही चूक केली नाही. त्यानंतरचे तुम्ही माझे व्हिडिओ पाहू शकता.
आता मी पायात घुंगरू घालून केसांचा अंबाडा बांधून नाचते”. असेही ती म्हणाली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Gautami Patil | gautami patil press conference about sangli program controversy

 

हे देखील वाचा :

Ind Vs Ban T20 World Cup | विराटच्या बॅटिंगवर अनुष्का झाली फिदा, दिली ‘हि’ Reaction

Raj Kundra | पॉर्न फिल्मचा व्यवसाय करतोस का? विचारणाऱ्या ट्रोलरला राज कुंद्राने दिले ‘हे’ उत्तर

Floating Solar Panel Project | ‘… तर भागवत कराड यांनी एकतरी कागद दाखवावा’, माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटलांचे खुले आव्हान

 

Related Posts