IMPIMP

Girish Bapat | पुरंदर, बारामती विमानतळाला विरोध नाही, पण पुण्यातील लोहगाव विमानतळ कुठेही हलवणार नाही – गिरीश बापट

by nagesh
Girish Bapat | BJP leader and MP girish bapat criticized to sharad pawar dont move pune lohegaon airport pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Girish Bapat | पुण्यातील लोहगाव विमानतळ (Pune Lohegaon Airport) कुठेही स्थलांतर करणार नसल्याची
आक्रमक भूमिका खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांनी घेतली आहे. ‘विमानतळ कुठेही हलवणार नाही. हे विमानतळ कोणाला सुप्याला
बांधायचं आहे, तर कोणाला बारामतीत बांधायचं त्यांनी बांधावं,’ असा टोला देखील खासदार बापट यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना लगावला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

”पुणे लोहगाव विमानतळ हे मध्यवर्ती असून पहिल्यापासून हा लष्करी प्रदेश आहे. पुण्याचा विस्तार, व्यापार, विद्यार्थी एक सांस्कृतिक शहर पाहताना प्रवासी संख्या वाढत आहे. पुण्यात 70 ते 80 हजार पेक्षा जादा प्रवासी वर्षाला प्रवास करत असतात. पुरंदर (Purandar), बारामती (Baramati) विमानतळ याला विरोध नाही उलट ती प्रगतीचे लक्षण आहेत. परंतु, पुणेकरांना बाकीचे विमानतळ सोयीचे नाहीत,” असं गिरीश बापट (Girish Bapat) यांनी म्हटलं आहे.

 

दरम्यान, पुढे बोलताना गिरीश बापट म्हणाले की, ”पुण्यातील विमानतळ स्थलांतर होणार नाही.
इथल्या सुविधा वाढवल्या जातील. कार्गो आधी लहान होता आता तोही मोठा करण्यात येणार आहे.”
त्याचबरोबर पुणेकरांना सोयीचे जिथे आहे तिथेच विमानतळ राहणार,’ असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.

 

 

Web Title :- Girish Bapat | BJP leader and MP girish bapat criticized to sharad pawar dont move pune lohegaon airport pune

 

हे देखील वाचा :

CP Krishna Prakash | पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची धडक कारवाई ! तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि हप्ता वसुल करणाऱ्या कर्मचाऱ्याची केली उचलबांगडी

Pune Crime | HDFC बँकेत अधिकारी असल्याचे सांगून ज्येष्ठ नागरिकाची 12 लाखांची फसवणूक, 2 महिलांसह तिघांवर FIR

Pune Crime | ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे’, अल्पवयीन मुलीने नकार देताच….; सराईत गुन्हेगार गजाआड

 

Related Posts