IMPIMP

Girls Marriage Age | …म्हणून केंद्र सरकारने घेतला मुलींच्या विवाहाचं वय वाढवण्याचा निर्णय

by nagesh
Girls Marriage Age | for this is reason central government increasing girls marriage age from 18 to 21- PM Narendra Modi

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Girls Marriage Age | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान मुलीचं लग्नाचं वय 18 वरुन 21 करण्याची घोषणा केली होती. यावरुन आता मुलीचं लग्नाचं वय 18 वरून 21 वर्षं करण्याचा ठराव मांडला आहे. यानूसार आता 2006 च्या बालविवाह प्रतिबंधक कायद्यात सुधारणा केली जाणार आहे. तसेच, 1955 चा विशेष विवाह कायदा आणि हिंदू विवाह कायद्यातही सुधारणा केली जाणार आहे. दरम्यान सुप्रीम कोर्टाने 2017 मध्ये बलात्कारविरोधी कायद्याबाबत (Anti-rape laws) सवाल उपस्थित केला होता. याच्या सहाय्याने केंद्र सरकारने (Central Government) मुलींच्या विवाहाचं वयवर्ष (Girls Marriage Age) वाढवण्याचा निर्णय घेतला जात असल्याची माहिती समोर येत आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) 2017 साली एक विधान केलं होतं. वैवाहिक बलात्कारातून सूट देण्याच्या प्रकरणातल्या सुनावणीवेळी आपल्या आदेशाद्वारे विवाहित अल्पवयीन आणि अविवाहित अल्पवयीन यांच्यातला अनावश्यक भेद दूर करत कोणताही कायदा संकुचित आणि स्थिर असू शकत नाही. समाजाच्या गरजेनुसार कायद्यात बदल व्हायला हवेत. असं न्यायालयाने म्हटलं होतं. हेच निरिक्षण लक्षात घेऊन केंद्र सरकारने मुलींच्या विवाहाचे वय वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

 

सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची दखल घेऊन सरकारच्या कायदेतज्ज्ञांनी मुलींच्या विवाहाचं कायदेशीर वय 18 वरून 21 वर्षं करण्याची सूचना केलीय.
ऑगस्ट 2018 मध्ये कायदा आयोगाने स्त्री आणि पुरुष दोघांसाठी लग्नाचं किमान वय 18 वर्षं असावं, असं मत मांडलं होतं.
म्हणजे पुरुषांच्या लग्नाचं वय कमी करण्याचा विचार केला जावा, असं यामधून सुचवण्यात आलं होतं.
या सर्व घडामोडींनंतर केंद्र सरकारने मुलींच्या विवाहाचं वय वाढवण्याचा निर्णय घेतला. असं संबधित सुत्राकडून सांगण्यात आलं आहे. (Girls Marriage Age)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

दरम्यान, मुलींच्या विवाहाचं वय 21 वर्षं करण्याबाबत विधेयक संसदेच्या स्थायी समितीकडे पाठवण्यात आले होते.
यानूसार केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी मंगळवारी (14 डिसेंबर)
रोजी लोकसभेत बालविवाह प्रतिबंध (सुधारणा) prevention child marriage act विधेयक मांडलं होतं.
दरम्यान मुलींच्या विवाहाचं वय वाढवण्याबाबत अनेक मतभेद देखील दिसून येत आहे.

 

 

Web Title :- Girls Marriage Age | for this is reason central government increasing girls marriage age from 18 to 21- PM Narendra Modi

 

हे देखील वाचा :

Wheatgrass-Reduce Uric Acid Levels | यूरिक अ‍ॅसिडचा स्तर कमी करण्यासाठी मदत करू शकते व्हीटग्रास, वेटलॉसमध्ये सुद्धा लाभदायक

Earn Money | नोकरी सोडून तुम्ही सुरू करू शकता ‘हा’ सुपरहिट बिझनेस, दरमहा आरामात होईल 5-10 लाखांची कमाई; जाणून घ्या कशी

Pune Crime | तळेगाव दाभाडेमधील 17 वर्षीय युवकाची हत्या गोळी झाडून नाही तर…

 

Related Posts