IMPIMP

Gold Price | सणासुदीत सुवर्णसंधी? सप्टेंबरमध्ये तब्बल 4 टक्क्यांनी उतरलं सोनं

by nagesh
Gold Price | gold prices dips 4 per cent in september 2021

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–  Gold Price | मागील आठवड्यापासून सोने आणि चांदीच्या किंमतीत घसरण होताना दिसत आहे. सप्टेंबर महिन्यातच सोन्याच्या दरात (Gold Price Today) सलग घसरण झाली आहे. त्यामुळे सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांना एक खास सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे शुक्रवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) (Gold Price) वर सोन्याच्या दरात 0.05 टक्क्यांचा घसरण झालीय. तर, सप्टेंबर मध्ये सोन्याचे भाव 4 टक्क्यांनी कमी झाले आहेत. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी ही योग्य वेळ आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत जोपर्यंत 1750 डॉलर प्रति औंसपेक्षा कमी आहेत तोपर्यंत सोन्याच्या किंमतीवर दबाव कायम राहील.
त्याचबरोबर या मौल्यवान धातूला $1680 च्या किंमतीच्या स्तरावर भक्कम आधार आहे.
अशा परिस्थितीत, सोन्याच्या किंमतीत (Gold Price) झालेली कोणतीही मोठी घसरण गुंतवणूकदार खरेदीची संधी म्हणून पाहू शकतात.
त्यामुळे सोन्याच्या घटत्या किमंत्यामुळे सोनं खरेदीसाठी बाजारात मोठ्याप प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे.

ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचे दर 45,500 रुपयांवरून 45,000 प्रति तोळापर्यंत घसरू शकणार आहेत.
या काळामध्ये अमरिकेत डॉलर मजबूत स्तरावर राहील. मात्र जेव्हा डॉलरमध्ये कमजोरी येण्यास सुरूवात होईल तेव्हा,
आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोन्याचा भाव 1750 डॉलर ते 1760 डॉलर प्रति औंसच्या पलीकडे पोहोचतील आणि तसेच, आगामी 1 महिन्यात 1800 डॉलर ते 1850 डॉलर प्रति औंसपर्यत पोहोचतील.
मल्टी कमोडिटी एक्सचेंज  वर सोन्याचे दर पुढील एका महिन्यात 48,000 ते 48,500 रपये प्रति तोळापर्यत जाऊ पोहचणार आहेत.

 

दरम्यान, कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीमुळे ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात सोन्यातील घसरणीची स्थिती बंद होऊ शकते.
शिवाय भारतात काहीच दिवसात फेस्टिव्ह सीझन सुरू होत आहे. त्यामुळ सोन्याची मागणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोन्याासाठी हा पॉझिटिव्ह आउटलुक आहे.

 

Web Title : Gold Price | gold prices dips 4 per cent in september 2021

 

हे देखील वाचा :

MP Amol Kolhe | ‘पवारसाहेबांना पंतप्रधान तर अजितदादांना मुख्यमंत्री करायचंय, त्यांना पुण्यात गुंतवून ठेवू नका’ – खा. अमोल कोल्हे

Eknath Khadse | …म्हणून माझ्या मागे ED चा ससेमिरा – एकनाथ खडसे

National Flag | अभिमान दिन ! गांधी जयंतीनिमित्त लेहमध्ये जगातील सर्वात मोठ्या खादीच्या तिरंग्याचे अनावरण, मुंबईतील कंपनीने बनवला ‘ध्वज’

 

Related Posts