IMPIMP

Gold Price Today | सोन्यात 269 रुपये तर चांदीत 630 रुपयांची मोठी वाढ, जाणून घ्या आजचे नवीन दर

by nagesh
Gold Price Today | gold price today climbs by rupees 269 and silver jumps by rupees 630 delhi mumbai kolkata dollar rupee

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Gold Price Today | भारतीय सराफा बाजारात आज म्हणजे 5 ऑक्टोबर 2021 ला सोन्याच्या दरात (Gold Price Today) तेजीचा कल होता. तरी सुद्धा सोने 46 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरापासून खाली राहीले. तर, चांदीच्या दरात (Silver Price Today) आज मोठी वाढ नोंदली गेली. मागील व्यवहाराच्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 45,497 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. चांदी 59,074 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाली होती. भारतीय सराफा बाजाराच्या उलट आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या दरात घसरण झाली, तर चांदीच्या दरात विशेष बदल झाला नाही.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

सोन्याचा नवीन दर (Gold Price Today)
दिल्ली सराफा बाजारात आठवड्याच्या दुसर्‍या व्यवहाराच्या दिवशी म्हणजे मंगळवारी सोन्याच्या दरात 269 रुपये प्रति 10 ग्रॅमची तेजी नोंदली गेली. दिल्लीत 99.9 ग्रॅम शुद्धतेचे सोने 45,766 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या दरात घसरण नोंदली गेली आणि तो 1,759 डॉलर प्रति औंसवर पोहचला.

चांदीचा नवीन दर (Silver Price Today)
चांदीच्या किमतीत आज चांगली तेजी पहायला मिळाली. दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी चांदी 630 रुपयांच्या मोठ्या तेजीसह 59,704 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाली. तर, आंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीच्या दरात विशेष बदल झाला नाही आणि ती 22.58 डॉलर प्रति औंसवर पोहचली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

सोन्यात का आली तेजी

एचडीएफसी सिक्युरिटीज (HDFC Security) चे सीनियर अनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी म्हटले की मंगळवारी भारतीय चलन,
रुपयात डॉलरच्या तुलनेत 32 पैशांची मोठी घसरण झाली आणि तो फॉरेक्स मार्केटमध्ये सकाळी 74.63 च्या खालच्या स्तरावर खुला झाला.
रुपयात झालेल्या या घसरणीचा परिणाम सोन्याच्या दरावर झाला आणि यामध्ये वाढ नोंदली गेली.

 

Web Title :- Gold Price Today | gold price today climbs by rupees 269 and silver jumps by rupees 630 delhi mumbai kolkata dollar rupee

 

हे देखील वाचा :

National Road Safety Board | नितीन गडकरींचा मोठा निर्णय, महाराष्ट्राला होणार फायदाच फायदा; जाणून घ्या

Aryan Khan Drugs Case | आर्यन खान, अरबाज मर्चंटच्या बाबतीत मॉडलिंग करणार्‍या मूनमूनच्या वकिलांनी केला ‘हा’ मोठा दावा

Indian Oil Recruitment 2021 | इंडियन ऑइलमध्ये तब्बल 513 जागांसाठी होणार भरती; पगार 1.05 लाख रुपयांपर्यंत

 

Related Posts