IMPIMP

Gold Price Update | सोन्याच्या किंमतीत जबरदस्त घसरणीने ग्राहक खुश, जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचा नवीन भाव

by bali123
Gold Price Today | gold price today on 24 september down by 1200 rupees down in a month

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Gold Price Update | जर तुम्हाला सोने किंवा सोन्याचे दागिने खरेदी करायचे असतील तर स्वस्त सोने खरेदी करण्याची तुमच्याकडे सुवर्णसंधी आहे. सध्या सोने आपल्या ऑलटाईम हायपासून जवळपास 9000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या हिशेबाने स्वस्त (Gold Price Update) विकले जात आहे. तर चांदी 17000 रुपये प्रति किलोग्रॅमच्या दराने मिळत आहे. या व्यवहाराच्या आठवड्यात अखेरच्या दिवशी शुक्रवारी सोने 47276 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 62887 रुपये प्रति किलोग्रॅमच्या स्तरावर बंद झाली होती.

24 कॅरेट सोने 47329 रुपये तोळा

सध्या भारतीय सराफा बाजारात 24 कॅरेटचे सोने 47329 रुपये प्रति 10 ग्रॅम, 23 कॅरेटचे सोने 47139 रुपये प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेटचे सोने 43353 रुपये प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेटचे सोने 35497 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 14 कॅरेटचे सोने 27687 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर आहे. सोने सध्या आपल्या सर्वोच्च स्तरापासून 8871 रुपये प्रति 10 ग्रॅम रुपये स्वस्त विकले जात आहे.

सोन्याच्या किमतीत होऊ शकते आणखी घसरण

इंडियन बुल अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) सुट्टीमुळे शनिवार आणि रविवारी सोने-चांदीचा रेट जारी करत नाही. जाणकारांनुसार, आगामी काळात सोन्याच्या किमतीत आणखी घसरण नोंदली जाऊ शकते.

सोन्याचा नवीन दर

या व्यवहाराच्या आठवड्यापासून अखेरच्या दिवशी शुक्रवारी सोन्याच्या किमतीत किरकोळ वाढ नोंदली गेली. शुक्रवारी (20 August) सोन्याच्या किमतीत 53 रुपये प्रति दहा ग्रॅमची तेजी दिसून आली. या तेजीसह सोने 47276 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर बंद झाले. गुरुवारी सोने 47276 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर बंद झाले होते.

चांदीचा नवीन दर

या व्यवहाराच्या आठवड्यात शेवटच्या दिवशी सोन्याच्या किमतीत तेजी नोंदली गेली तर चांदीच्या किमतीत घसरण.
शुक्रवारी चांदी 1108 रुपये प्रति किलोग्रॅमच्या दराने स्वस्त झाली.
या घसरणीनंतर चांदी 62233 रुपये प्रति किलोग्रॅमच्या स्तरावर बंद झाली.
यापूर्वी गुरूवारी चांदी 63341 रुपये प्रति किलो होती.

या आठवड्यात आतापर्यंत सोने-चांदीची अशी होती वाटचाल

– सोमवारी (16 ऑगस्ट) 24 कॅरेटचे सोने 46993 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते.
तर चांदी 62887 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती.

– मंगळवारी (17 ऑगस्ट) सोने 47583 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 63977 रुपये प्रति किलोग्रॅमच्यावर बंद झाली होती.

– बुधवारी (18 ऑगस्ट) सोने 47583 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 63936 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होते.

– गुरुवारी (19 ऑगस्ट) सोने 47276 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 63341 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली.

– तर या व्यवहाराच्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी सोने 47276 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 62471 रुपये प्रति किलोग्रॅमच्या स्तरावर बंद झाली.

Web Tital : Gold Price Update | gold silver jewelry price rate update 21th august know latest rate indian sarafa market today

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 221 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Ganesh Utsav | लसीचे 2 डोस घेतलेल्यांना गणेशोत्सव साजरा करण्याची परवानगी द्या; मनसेची मागणी

Crime News | पोलिसाने केला अल्पवयीन युवतीचा विनयभंग; पोलीस तडकाफडकी निलंबित 

Related Posts