IMPIMP

Gold Silver Price Today | आजही सोन्या-चांदीच्या किंमती कमीच; जाणून घ्या आजचे दर

by nagesh
Gold Silver Price Today | gold rate price today on 18 october 2021 forecast outlook silver price rate today

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Gold Silver Price Today | सोन्या चांदीच्या किंमतीत सातत्याने (Gold Silver Price Today) बदल होत असतात. दररोजच्या होणा-या बदलामध्ये या महिन्यात सोन्याच्या भावात अधिक प्रमाणात घट झाली आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात आणि भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किंमती कमी होताना दिसत आहेत. दस-याच्या आगोदर सोन्याच्या किंमती उतरताना दिसल्या. मात्र दसरा कालावधीत काही प्रमाणात सोन्याचे दर वाढले. आज (सोमवारी) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 47,070 रुपये पर्यंत पोहचला आहे. त्याचबरोबर चांदीची किंमत 63,600 रुपये प्रति किलो पर्यंत पोहचली आहे.

मागील काही आठवड्यापुर्वी सोने आणि चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price) साधारण प्रमाणात घट होताना दिसल्या. दसरा शुभ मुहूर्तावर या कालावधीत सोन्याचा भाव मात्र काही प्रमाणात वाढताना दिसला. दरम्यान, मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत 47,070 रुपये प्रति 10 ग्रॅमवरवरच बंद झाली होती. तर, आज सोन्याच्या दरात पुन्हा घसरण झाली असल्याचं पाहायला मिळालं.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तसेच, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले  आहेत.

आजचा सोन्याचा भाव –

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 45,470 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 48,690 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,070 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 47,070 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,070 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 48,070 रुपये

आजचा चांदीचा भाव – 63,600 रुपये प्रति किलो.

 

Web Title: Gold Silver Price Today | gold rate price today on 18 october 2021 forecast outlook silver price rate today

 

हे देखील वाचा :

Pune News | भारतीय समतावादी पक्षाचे रक्तदान शिबीर संपन्न

BJP Vs Shivsena | भाजपचे शिवसेनेला प्रत्युत्तर; ‘… त्यांच्याच कौतुकाच तुणतुणं वाजवत फिरायची शिवसेनेवर वेळ आली’

Chitra Wagh | ‘चोरांना व त्यांच्या सरदारांना हिशोब द्यावाच लागेल’ – चित्रा वाघ यांचा राऊतांवर पलटवार

 

Related Posts