IMPIMP

Thane ACB Trap | 3 हजाराची लाच घेताना पोलीस अ‍ॅन्टी कप्शनच्या जाळ्यात, पोलीस ठाण्यातच स्विकारली लाच

by nagesh
ACB Trap News | Anti-corruption Bureau Nanded: Women sarpanch and gram sevak caught in anti-corruption net while fleeing after taking bribe

पालघर : सरकारसत्ता ऑनलाईन – पोलीस ठाण्यात प्राप्त झालेल्या बेलेबल वॉरंटमध्ये (Bailable Warrant) अटक (Arrest) न करण्यासाठी व कदबा भरून न्यायालयात अहवाल सादर केल्याच्या मोबदल्यात 15 हजार रुपये लाचेची मागणी करुन तीन हजार रुपये लाच स्विकारताना (Accepting Bribe) पालघर जिल्ह्यातील अर्नाळा पोलीस ठाण्यातील (Arnala Police Station) पोलीस हवालदाराला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Thane ACB Trap) सापळा रचून रंगेहात पकडले. कमलाकर बिरबा मदने Kamlakar Birba Madane (वय 44) असे लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे (Police Constable) नाव आहे. ठाणे एसीबीच्या पथकाने (Thane ACB Trap) ही कारवाई आज (मंगळवार) दुपारी सव्वाबाराच्या सुमारास अर्नाळा पोलीस ठाण्यात केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत 28 वर्षीय व्यक्तीने ठाणे एसीबीकडे (Thane ACB Trap) सोमवारी (दि.19) लेखी तक्रार दिली होती. तक्रारदार यांच्या वडिलांचे बेलेबल वॉरंट अर्नाळा पोलीस ठाण्याला प्राप्त झाले आहे. यामध्ये अटक न करता कदबा भरून न्यायालयात अहवाल सादर करण्यात आला होता. याचा मोबदला म्हणून पोलीस हवालदार कमलाकर मदने यांनी तक्रारदार यांच्याकडे 15 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 10 हजार रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी ठाणे एसीबीकडे (Anti Corruption Bureau) तक्रार केली.

 

ठाणे एसीबीच्या युनिटने आज (मंगळवार) पडताळणी केली असता पोलीस हवालदार कमलाकर मदने यांनी तक्रारदार यांच्याकडे 15 हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती 10 हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसर आज अर्नाळा पोलीस ठाण्यात सापळा रचण्यात आला.
तक्रारदार यांच्याकडून तीन हजार रुपये लाच घेताना कमलाकर मदने यांना रंगेहात पकडण्यात आले.
मदने यांच्यावर अर्नाळा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (Prevention of Corruption Act) गुन्हा दाखल करुन ताब्यात घेण्यात आले आहे.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक सुनिल लोखंडे (SP Sunil Lokhande), अपर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर
(Addl SP Anil Gherdikar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक नवनाथ जगताप
(DySP Navnath Jagtap), पोलीस निरीक्षक स्वपन बिश्वास (Police Inspector Swapan Biswas),
पोलीस अंमलदार अमित चव्हाण, विलास भोये, नितीन पागधरे, निशा मांजरेकर, दिपक सुमडा, नवनाथ भगत,
सखाराम दोडे, स्वाती तारवी यांच्या पथकाने केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Thane ACB Trap | 3,000 in the net of police anti-graft, the bribe was accepted in the police station itself

 

हे देखील वाचा :

Winter Health Care Tips | थंडीत सतत येत असेल खोकला, तर व्हा सतर्क; निष्काळजीपणामुळे होऊ शकते इन्फेक्शन

Heart Attack | लग्न-उत्सवांमध्ये वाढताहेत ‘हार्ट अटॅक – कार्डियाक अरेस्ट’ची प्रकरणे; तज्ज्ञांनी सांगितली याची मुख्य कारणे

Winter Hair Care | हिवाळ्यात केसांची घ्या चांगली काळजी, डँड्रफपासून सुटका मिळवण्यासाठी ५ घरगुती उपाय

Sanjay Raut | देवेंद्र फडणवीस यांच्या ‘त्या’ दाव्यावर संजय राऊतांचा खोचक टोला, म्हणाले-‘नैरोबी-केनियाला देखील… ‘

 

Related Posts