IMPIMP

Gulabrao Patil | ‘आजपर्यंत एक नेता म्हणून इज्जत ठेवली, नाहीतर…’ गुलाबराव पाटलांचा आदित्य ठाकरेंना थेट इशारा (व्हिडीओ)

by nagesh
Gulabrao Patil | instead of torturing us by saying the same thing build a new party gulabrao patil s reaction to aditya thackerays claim regarding eknath shinde revolt

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन शिवसेना (Shivsena) पक्षात फूट पडल्यापासून राज्यात ’50 खोके, एकद ओके’ ही घोषणा गाजत आहे. शिवसेना
नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) सातत्याने शिंदे गटावर (Shinde Group) टीका करत आहेत. बंडखोर आमदारांचा (Rebel MLA) ‘गद्दार’
असा उल्लेख करत आहेत, तर हे खोके सरकार असल्याची टीकाही ते सतत करत आहेत. आदित्य ठाकरेंच्या टीकेला पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव
पाटील (Gulabrao Patil) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. आज मंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर गुलाबराव पाटील (Gulabrao Patil)
प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या राजकीय प्रश्नांवर भाष्य केलं.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेबाबत गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांना विचारले असता ते म्हणाले, मी काल-परवाच बोललो आहे की,
आदित्य ठाकरेंचं वय 32 वर्षे आहे आणि मी शिवसेनेत 35 वर्षापासून काम करतोय. आदित्य ठाकरे हे बाळासाहेबांच्या (Balasaheb Thackeray)
संपत्तीचे वारसदार होऊ शकतात, पण ते विचारांचे वारसदार नाहीत. आदित्य ठकेरेंवर किती गुन्हे (FIR) दाखल झाले? हे तुम्ही त्यांना विचारु शकता, ते
कोणत्या तुरुंगात गेले हेही विचारा… नाहीतर आम्ही त्यांना सांगतो की 100 वेळा आम्ही काय-काय भोगलं आहे. कलम 302, 307, 156ब, 110 हे काय
असतं हे तरी त्यांना माहित आहे का? असा सवाल पाटील यांनी विचारला.

 

 

आदित्या ठाकरेंना आमदार होण्यासाठी आम्हाला दोन एमएलसी (MLC) कराव्या लागल्या. ते जर वारसदार असतील, तर दोन-दोन एमएलसी देण्याची गरजच काय होती? निवडून येण्यासाठी त्यासाठी तुम्हाला आश्वासनं द्यावी लागली. आम्ही खरे वारसदार आहोत, आम्ही पडल्यावरही उभं राहिलो आणि उभं राहिल्यावरही पडलो. आजपर्यंत एक नेता म्हणून त्यांची इज्जत ठेवली आहे. त्यांनी वयाची आणि आमच्या अनुभवाची विनाकारण खिल्ली उडवू नये. नाहीतर आम्ही बोलण्यात इतके कठीण आहोत की त्यांना आवरणं मुश्कील होईल, असा थेट ईशारा गुलाबराव पाटील यांनी दिला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

वरिष्ठांचा आदेश पाळू

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former CM Uddhav Thackeray) यांना धक्का देत आता थेट शिंदे गटच शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दसरा मेळावा घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. यात विशेष म्हणजे मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) पहायला मिळू शकतात अशीही चर्चा आहे. तसेच मनसे आणि शिंदे गट एकत्र येणार असल्याची चर्चाही रंगत आहे. याच दरम्यान तो आमचा विषय नाही, वरिष्ठ जो आदेश देतील तो आम्ही पाळू, असे पाटील यांनी सांगितले.

 

Web Title :-  Gulabrao Patil | aditya uddhav thackeray should consider our age otherwise gulabrao patil was immediately breathless

 

हे देखील वाचा :

Rashmi Bagal | रश्मी बागल सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात जाणार? त्यांच्यावर होता उध्दव ठाकरेंचा ‘विश्वास’

Maharashtra Politics Crisis | महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष निर्णायक टप्प्यावर, घटनापीठापुढे सुनावणी होण्याचा मार्ग मोकळा

CM Eknath Shinde – MLA Sanjay Shirsat | मुख्यमंत्री निवास ’वर्षा’वरील स्नेहभोजनाला एकनाथ शिंदे गटाचे औरंगाबादचे आ. संजय शिरसाट जाणार नाहीत; चर्चांना उधाण

 

Related Posts