IMPIMP

Maharashtra Politics Crisis | महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष निर्णायक टप्प्यावर, घटनापीठापुढे सुनावणी होण्याचा मार्ग मोकळा

by nagesh
Maharashtra Political Crisis | supreme court will decision tomorrow on the dispute between shiv sena and shinde group rahul shewale and anil desai going to delhi

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Maharashtra Politics Crisis | एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह समर्थक आमदारांनी शिवसेनेत बंडखोरी (Rebellion in Shivsena) केल्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) स्थापन झाले. त्यानंतर महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा वाद सुप्रीम कोर्टात (Supreme Court) पोहचला. शिवसेना आणि शिंदे गटामध्ये (Shinde Group) सुरु असलेला न्यायालयीन लढा आता निर्णायक टप्प्यावर (Maharashtra Politics Crisis) आला आहे. शिवसेना आणि शिंदे गटाच्या वादावर उद्या बुधवारी घटनापीठाची (Constitution Bench) स्थापना केली जाईल असे आश्वासन सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. त्यामुळे राज्यातील सत्तासंघर्षावर आता सुनावणी होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांच्या मुंबई दौऱ्यानंतर आता शिंदे गट
आक्रमक झाला आहे. शिंदे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.
शिंदे गटाकडून सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल (Writ Petition) केली होती.
केंद्रीय निवडणूक आयोगाची (Central Election Commission) सुनावणी सुरु ठेवावी, निवडणूक आयोगाच्या
सुनावणीला स्थगिती देऊ नये, अशी मागणी शिंदे गटाने केली आहे.
तसेच सुप्रीम कोर्टाने त्वरीत सुनावणी घ्यावी आणि निवडणूक आयोग प्रक्रीयेबाबत निर्णय घ्यावा, अशी विनंती शिंदे गटाने सुप्रीम कोर्टाला केली आहे.

 

 

शिंदे गटाने रिट याचीका दाखल केल्यानंतर आता सरन्यायाधीश यू यू ललित (Chief Justice U U Lalit) यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने उद्या खंडपीठाची स्थापना केली जाईल असे आश्वासन दिले आहे.
त्यामुळे लवकरच महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या (Maharashtra Politics Crisis) प्रकरणावर पाच न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे सुनावणी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

 

शिवसेनेचे पक्षचिन्ह धनुष्यबाण (Dhanushya Ban Symbol) मिळवण्यासाठी शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती.
मात्र, सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाच्या सुनावणीला स्थगिती दिली.
या वादावर पाच न्यायाधीशांचे खंडपीठ स्थापन केले आहे.
या प्रकरणावर सुनावणी कधी होणार, याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

 

 

Web Title :- Maharashtra Politics Crisis | constitution bench will be established in the supreme court tomorrow on the dispute between shiv sena and shinde group

 

हे देखील वाचा :

CM Eknath Shinde – MLA Sanjay Shirsat | मुख्यमंत्री निवास ’वर्षा’वरील स्नेहभोजनाला एकनाथ शिंदे गटाचे औरंगाबादचे आ. संजय शिरसाट जाणार नाहीत; चर्चांना उधाण

FCI Recruitment 2022 | फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या 5043 पदांसाठी भरती

Dhule Soldier Manohar Patil Martyred In Siachen | सियाचिनमध्ये देशसेवा करताना धुळ्याचे जवान मनोहर पाटील यांना वीरमरण

 

Related Posts