IMPIMP

Gulabrao Patil | ‘चौकटीत राहून बोलावं, नाहीतर पाचोऱ्याच्या सभेत घसून…’, गुलाबराव पाटलांचा इशारा

by nagesh
Gulabrao Patil | gulabrao patals warning to sanjay raut over the rally in pachora

जळगाव : सरकारसत्ता ऑनलाईन – शिंदे गटाचे (Shinde Group) मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांचा बालेकिल्ला असलेल्या
जळगावमधील पाचोऱ्यात शिवसेना ठाकरे गटाची (Shiv Sena Thackeray Group) सभा होत आहे. परंतु या सभेपूर्वीच राजकारण तापल्याचे
पाहायला मिळत आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांना (Sanjay Raut) इशारा दिला आहे. चौकटीत राहून बोलावं नाहीतर सभेत घसुणार
असं आव्हान पाटील यांनी दिलं आहे. गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या या इशाऱ्याला ठाकरे गट काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले
आहे.

 

महाविकास आघाडीकडून राज्यभरात वज्रमूठ सभा (MVA Vajramuth Sabha) घेतल्या जात आहेत. त्यांची पहिला सभा संभाजीनगर तर दुसरी सभा नागपूरात झाली. या सभेच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे नेते भाजप (BJP) आणि शिंदे गटावर हल्लाबोल करत आहेत. सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न मविआकडून केला जात आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाकडून देखील सभा घेतल्या जात आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मालेगाव येथे सभा झाल्यानंतर आता त्यांची दुसरी सभा पाचोऱ्यात होणार आहे. या सभेवरुन गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी संजय राऊतांना इशारा दिला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

दोघांची इच्छा आहे पण…

मला वाटतं अजून तिथी जवळ आलेली नाही. गुणही जुळत नाही. त्यामुळे कोणती पुजा करावी लागते, हे एखाद्या ब्राह्मणाला विचारायला लागेल. पण वेळ येईल काळजी करु नका, अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी दिली. तसेच अजित पवारांच्या (Ajit Pawar) भाजप प्रवेशाचा मुहूर्त खरंच आहे का? असं विचारलं असता, ही वेळ लवकरच येईल. दोघांची इच्छा आहे. पण गुण जुळत नसल्याचं ब्राह्मणाचं म्हणणं आहे, अशी मिश्कील टीप्पणी गुलाबराव पाटील यांनी बुधवारी केली होती.

 

 

Web Title :-  Gulabrao Patil | gulabrao patals warning to sanjay raut over the rally in pachora

 

हे देखील वाचा :

Congress Leader Rahul Gandhi | राहुल गांधींच्या अडचणीत वाढ, सूरत न्यायालयाने ‘ती’ याचिका फेटाळली

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : चंदननगर पोलिस स्टेशन – आरबीआय बँकेत नोकरीच्या आमिषाने ३० लाखांची फसवणूक

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : कोंढवा पोलिस स्टेशन – बंदुकीचा धाक दाखवून महिलेवर बलात्कार; गुंतवणुक केलेले ४ कोटी परत मागितल्याने केला अत्याचार

 

Related Posts