IMPIMP

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : चंदननगर पोलिस स्टेशन – आरबीआय बँकेत नोकरीच्या आमिषाने ३० लाखांची फसवणूक

by nagesh
Pune Crime News | Pune Crime News : Chandannagar Police Station - RBI Bank fraud of Rs 30 lakhs

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Pune Crime News | बेलापूर येथील आरबीआय बँकेत (RBI Bank) नोकरी लावण्याच्या आमिषाने ३८ लाख ५० हजार रुपये घेऊन फसवणूक (Cheating Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे.

 

याप्रकरणी वडगाव शेरी येथील एका ५२ वर्षाच्या नागरिकाने चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये (Chandannagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १६०/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सदानंद बाळकृष्ण भोसले Sadanand Balkrishna Bhosale (वय ६२, रा. नवी मुंबई) आणि संभाजी विजय पाटील Sambhaji Vijay Patil (वय ४१, रा. नाशिक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार पुणे व नवी मुंबईतील बेलापूर येथे फेब्रुवारी २०२२ ते ऑगस्ट २०२२ दरम्यान घडला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करुन फिर्यादी यांचे मुलगा व मुलीस आरबीआय बँक बेलापूरमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांना पैसे द्यावे लागतील, असे सांगून वेळोवेळी त्यांच्याकडून ३८ लाख ५० हजार रुपये घेतले. त्यानंतरही त्यांच्या मुलगा व मुलीला नोकरीला लावले नाही. त्यांनी पैसे परत मागितले असता ते परत न केल्याने शेवटी आपली फसवणुक (Fraud Case) केल्याचे लक्षात आल्यावर आता त्यांनी फिर्याद दिली असून पोलीस निरीक्षक जानकर तपास करीत आहेत.

 

Web Title :-  Pune Crime News | Pune Crime News : Chandannagar Police Station – RBI Bank fraud of Rs 30 lakhs

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : कोंढवा पोलिस स्टेशन – बंदुकीचा धाक दाखवून महिलेवर बलात्कार; गुंतवणुक केलेले ४ कोटी परत मागितल्याने केला अत्याचार

MP Sanjay Raut | ‘देवेंद्र फडणवीस जर आता विरोधी पक्षनेते असते, तर…’, संजय राऊतांना नेमकं म्हणायचं काय?

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : चंदननगर पोलिस स्टेशन – अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या कामगाराला अटक

 

Related Posts