IMPIMP

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : कोंढवा पोलिस स्टेशन – बंदुकीचा धाक दाखवून महिलेवर बलात्कार; गुंतवणुक केलेले ४ कोटी परत मागितल्याने केला अत्याचार

by nagesh
 Pune Crime News | Pune Crime News : Kondhwa Police Station - Woman raped at gunpoint; Atrocities committed for demanding return of 4 crores invested

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Pune Crime News | व्यवसायासाठी गुंतविलेले ४ कोटी रुपये परत घेण्यासाठी घरी गेल्या असताना बंदुकीचा धाक
दाखवून त्याने बलात्कार (Rape Case) केला. त्याचे व्हिडिओ शुटींग (Video Shooting) करुन वारंवार शारीरीक संबंध (Physical Relationship)
ठेवण्यास भाग पाडल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

 

याबाबत एका ४८ वर्षाच्या महिलेने कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४०६/२३) दिली आहे. त्यानुसार
पोलिसांनी जुगनू ऊर्फ शफिक शेख Juganu alias Shafiq Sheikh (वय ४५), मुस्ताक मोमीन (वय ४६), केतन व महाराज अशा चौघांवर गुन्हा दाखल
केला आहे. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व जुगनू शेख याच्यांमध्ये भिशी होती. ही २०२० मध्ये बंद झाली. त्यानंतर शेख याने फिर्यादी यांना दुसरा व्यवसाय करु असे सांगून फिर्यादी व फिर्यादी यांची मैत्रिण यांचेकडून ५० लाख असे ६ हप्ते मिळून एकूण ४ कोटी रुपये वेळोवेळी घेतले. २०२० -२०२१ मध्ये गुंतवणुकीसाठी त्याने हे पैसे घेतले होते. मात्र, त्यांना काहीही मोबदला न देता त्यांची आर्थिक फसवणूक (Cheating Case) केली. फिर्यादी या पैसे मागण्यासाठी शेख याच्या कोंढवा येथील घरी गेल्या होत्या. शेख याने फिर्यादी यांना बेडरुममध्ये बोलावून बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्याबरोबर अनैसर्गिकरित्या शरीरसंबंध ठेवले. इतर आरोपींनी फिर्यादी व शेख यांचे नग्न अवस्थेतील फोटो व शरीरसंबंध करतानाचे व्हिडिओ शुटिंग काढले. फिर्यादी यांना मारुन टाकण्याची धमकी देऊन वारंवार शारीरीक संबंध ठेवण्यास भाग पाडले. शेवटी या त्रासाला कंटाळून त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार नोंदविली. पोलीस उपनिरीक्षक शेख तपास करीत आहेत.

 

 

Web Title :-  Pune Crime News | Pune Crime News : Kondhwa Police Station – Woman raped at gunpoint; Atrocities committed for demanding return of 4 crores invested

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : चंदननगर पोलिस स्टेशन – अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या कामगाराला अटक

MP Sanjay Raut | ‘देवेंद्र फडणवीस जर आता विरोधी पक्षनेते असते, तर…’, संजय राऊतांना नेमकं म्हणायचं काय?

Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे-पिंपरी क्राईम न्यूज : पिंपरी पोलिस स्टेशन – विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या नावाने बनावट सर्टिफिकेट तयार करुन संस्थेच्या बदनामीचा प्रयत्न

Sanjay Shirsat On Sanjay Raut | ‘संजय राऊत हा स्वत:च्या बापालाही…’ अजित पवारांचा उल्लेख करत संजय शिरसाटांची टीका

 

Related Posts