IMPIMP

Har Har Mahadev | “‘हर हर महादेव’ चित्रपट बाबासाहेब पुरंदरेंनी लिहिला का?” आंनद दवेंची जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका

by nagesh
Jitendra Awhad | jitendra awhad stands on his comment about his shivaji maharaj controversial comment

सरकारसत्ता ऑनलाईन  टीम – सध्या राज्याचे राजकारण मोठ्या प्रमाणात तापले आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) आणि सत्ताधारी यांच्यात आरोप- प्रत्यारोप सुरु आहेत. त्यातच आता ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) आणि ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ (Vedat Ved Marathe Veer Daudle Saath) हे चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांना मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसत आहे. या चित्रपटावरून राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) याबाबत आक्रमक झाली असून, राज्यातील काही ठिकाणी ‘हर हर महादेव’ चित्रपटाचे शो बंद पाडण्यात आले. या सगळ्यावरून राष्ट्रवादीवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. (Har Har Mahadev)

 

‘हर हर महादेव’ चित्रपटाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचा ठाण्यातील शो बंद पाडण्यात आला होता. त्यामुळे आता ब्राह्मण महासंघाचे नेते आनंद दवे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी राष्ट्रवादीवर टीका करत पलटवार केला आहे. या सिनेमाला सर्वात प्रथम विरोध आम्ही केला, असा दावादेखील आनंद दवे यांच्याकडून करण्यात आला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

फक्त पुरंदरेच दिसतात का तुम्हाला?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी जाहीरपणे बाबासाहेबांचे कौतुक केले होते, त्याबाबत काय बोलणार आहात? राजांना सेक्युलर ठरवण्याचे पाप तुम्ही आणि तुमचे सहकारी वारंवार करत आहात? द्याल का पुरावे? स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींना हाल हाल करून मारणाऱ्या औरंगजेबाच्या जातीवर कधी बोलणार आहात? का फक्त पुरंदरेच दिसतात तुम्हाला? द्या याची उत्तरे. आम्ही तयार आहोत तुमच्या बरोबर जाहीर चर्चा करायला. तुम्ही तयार आहात का चर्चेला? असे खुले आव्हानच यावेळी आनंद दवे यांनी जितेंद्र आव्हाड यांना दिले आहे.

 

‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या वादात बाबासाहेब पुरंदरे यांना का ओढता आहात? बाबासाहेब पुरंदरे यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे का? बाबासाहेबांच्या कोणत्या लेखात असा उल्लेख आहे? चित्रपटाच्या आडून जातीय राजकारण का करता आहात? असा सवालदेखील आंनद दवे यांनी यावेळी उपस्थित केला.

 

Web Title :- Har Har Mahadev | anand dave replied ncp and jitendra awhad over criticism on balasaheb purandare about har har mahadev movie

 

हे देखील वाचा :

MP Sanjay Raut | तुरुंगाबाहेर येताच संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले-‘आलोय बाहेर… आता बघू, आम्ही…’

T20 World Cup | रोहित शर्मा इंग्लंडविरुद्ध सेमीफायनलमध्ये खेळणार की नाही? दिली ‘हि’ मोठी अपडेट

Chandrakant Khaire | संजय राऊतांच्या लेखणीचा झाला विजय – चंद्रकांत खैरे

T20 World Cup | सेमी फायनलपूर्वी इंग्लंडला दुसरा धक्का ! ‘हा’ प्रमुख खेळाडू झाला जखमी

 

Related Posts