IMPIMP

Heart Attack | ‘या’ 10 कारणांमुळे अचानक येऊ शकतो हार्ट अटॅक, कॉफी-सेक्स आणि मायग्रेनपासून सुद्धा रहा सावध

by nagesh
Heart Attack | 10 unexpected heart attack triggers sleep migraine

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Heart Attack | हृदयाच्या मांसपेशींना होणार्‍या रक्तपुरवठ्यात अडथळा आल्यास मनुष्याला हार्ट अटॅक येतो. धूम्रपान, हाय फॅट डाएट, डायबिटीज, हाय कॉलेस्ट्रोल, हाय ब्लड प्रेशर किंवा लठ्ठपणास हार्ट अटॅकचे मोठे कारण समजले जाते. परंतु अनेक इतरही कारणे आहेत जी हार्ट अटॅक ट्रिगर करू शकतात, ज्यांच्याकडे मनुष्याचे लक्ष जात नाही. नुकताच वर्ल्ड हार्ट डे संपूर्ण जगात साजरा झाला, या निमित्त अशा 10 कारणांबाबत जाणून घेवूयात (10 reasons that can cause a sudden heart attack) …

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

1. कमी झोप – Less sleep
थकव्यानंतर योग्य झोप मिळाली नाही, तर हार्ट अटॅकची जोखीम वाढते. संशोधनानुसार 6 तासापेक्षा कमी झोप घेणार्‍यांना हार्ट अटॅकचा धोका 6-8 तास झोप घेणार्‍यांच्या तुलनेत दुप्पट असतो. कमी झोपल्याने ब्लड प्रेशर आणि इन्फ्लेमेशनची समस्या वाढते.

2. मायग्रेन – Migraine
मायग्रेनची समस्या असल्यास स्ट्रोक, छातीत वेदना आणि हार्ट अटॅक येण्याची शक्यता जास्त असते. हृदयरोग आणि मायग्रेन दोन्ही असेल तर मायग्रेनचे ट्रिपटॅन औषध घेऊ नये. कारण ते रक्त वाहिन्यांना संकुचित करते. डॉक्टरांचा सल्ला घ्या.

3. थंड हवामान – Cold weather
थंड तापमानात राहिल्याने आपल्या धमण्या आकुंचित पावतात आणि या कारणामुळै वाहिन्यांद्वारे हृदयापर्यंत होणार्‍या रक्तपुरवठ्यात अडथळा निर्माण होतो. यासाठी अशा हवामानात मांसपेशी गरम ठेवण्यासाठी फिजिकल अ‍ॅक्टिविटी आवश्यक आहे.

4. जास्त खाणे – Overeating
एकाच वेळी खुप जास्त प्रमाणात खाण्याने शरीरात स्ट्रेस हार्मोन नोरएपिनेफ्रीन रिलीज होते. ते ब्लड प्रेशर आणि हार्ट रेट वाढवून हार्ट अटॅकला ट्रिगर करू शकते.

5. स्ट्राँग इमोशन – Strong Emotions
राग, दुख आणि तणावसारख्या भावना सुद्धा हार्टसंबंधी समस्यांना ट्रिगर करू शकतात. खुप जास्त आनंद सुद्धा अनेकदा हार्ट अटॅकचे कारण ठरू शकतो.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

6. व्यायाम – Exercise
खुप जास्त व्यायाम केल्यास हार्ट अटॅक येऊ शकतो.

 

7. सेक्स

खुप जास्त व्यायामाप्रमाणे सेक्शुअल अ‍ॅक्टिव्हिटी सुद्धा हार्ट अटॅकची जोखीम वाढवू शकते. हृदयसंबंधी समस्या असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

8. कोल्ड फ्लू – Cold flu
2018 च्या संशोधनानुसार, फ्लू झाल्यानंतर एक आठवड्यानंतर लोकांमध्ये हार्ट अटॅकची शक्यता वाढते. याचे कारण रक्ताशी संबंधीत आहे.

9. कॉफी – Coffee
कॉफीतील कॅफीन कमी काळासाठी तुमचे ब्लड प्रेशर वाढवते आणि यामुळे मनुष्याला हार्ट अटॅक येऊ शकतो.
दिवसात 2 ते 3 कप कॉफी पिऊ शकता.

10. सकाळी बिछान्यातून उठणे – Getting out of bed in the morning
एखाद्या मनुष्याला सकाळी हृदय विकाराचा झटका येणे सामान्य आहे.
कारण आपला मेंदू शरीराला हार्मोनने भरतो, ज्यामुळे आपल्याला जागे होण्यास मदत होते.
यामुळे हार्टवर अतिरिक्त तणाव वाढतो. मोठ्या झोपेनंतर तुम्ही डिहायड्रेटेड सुद्धा होऊ शकता, ज्यामुळे हृदयाला जास्त मेहनत करावी लागते.

 

 

Web Title :- Heart Attack | 10 unexpected heart attack triggers sleep migraine

 

हे देखील वाचा :

Driving Licence New Rules 2021 | दिलासादायक ! ‘DL’साठी आता RTO कडे जायची गरज नाही; ‘या’ संस्था देखील देणार परवाना

Pravin Darekar | ‘माझ्याकडे बोट दाखवून संधी दिलीय, आता पुण्यासह इतर जिल्हा बँकेचे घोटाळे काढणार’ – प्रवीण दरेकर (व्हिडीओ)

Crime News | संतापजनक ! नशेचे औषध देऊन डॉक्टरकडून महिला कॉन्स्टेबलवर बलात्कार

 

Related Posts