IMPIMP

Hemant Rasne | पुण्यातील मध्यवर्ती पेठांतील रस्ते 20 जानेवारीपर्यंत पूर्ववत होणार, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांची माहिती

by nagesh
Hemant Rasne | Hemant Rasane's petition in the high court against the Pune Municipal Corporation (PMC), find out what the case is

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन मध्यवर्ती पेठांतील महत्त्वाचे रस्ते 20 जानेवारीपर्यंत पूर्ववत होतील अशी ग्वाही स्थायी समितीचे अध्यक्ष (Standing Committee Chairman) आणि स्थानिक नगरसेवक हेमंत रासने (Hemant Rasne) यांनी दिली. केळकर रस्ता आणि टिळक रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ आज (शुक्रवार) हेमंत रासने (Hemant Rasne) यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी ते बोलत होते.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

 

यावेळी नगरसेविका गायत्री खडके (Corporator Gayatri Khadke), माजी नगरसेवक दिलीप काळोखे (Dilip Kalokhe), कसबा मतदारसंघाचे भाजपचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे (Pramod Kondhare), उदय लेले, किरण जगदाळे, दीलीप पवार, निलेश कदम, मनिष जाधव, सौरभ रायकर, अनिल बेलकर, विनायक रासने, संकेत थोपटे, परेश मेहेंदळे, योगिता गोगावले, रीना सपकाळ उपस्थितीत होते.

 

हेमंत रासने (Hemant Rasne) म्हणाले, मध्यवर्ती पेठांच्या भागात मुख्य बाजारपेठ (Main market) असल्याने, तेथे दररोज मोठ्या प्रमाणात रहदारी असते. त्यामुळे गेली पंचेचाळीस वर्षे या भागातील पाणीपुरवठा (Water supply) आणि मैलापाण्याचे वहन करणाऱ्या वाहिन्या बदलताना मर्यादा येत होत्या. कोविडमुळे निर्माण झालेल्या टाळेबंदीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच बाजारपेठ बंद होती. त्या काळात समान पाणीपुरवठा, मैलापाणी वहन, एमएनजीएल पुरवठा (MNGL supply), इंटरनेट कंपन्या यांच्या वाहिन्या आणि केबल्स टाकण्याची विकासकामे तातडीने पूर्ण करण्यात आली. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात खोदाई करावी लागल्याने रस्त्यांची दुरावस्था झाली होती. या पूर्वी निकृष्ट कामांमुळे रस्त्यांची दुरावस्था होत होती. आता सर्व प्रमुख रस्ते पूर्ववत करण्यासाठी नियोजनबद्ध काम सुरू करण्यात आले आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

रासने म्हणाले, गेल्या महिन्यात आयुक्त विक्रम कुमार (Commissioner Vikram Kumar)
आणि महापालिका अधिकाऱ्यांसोबत या भागातील विविध विकासकामांची पाहाणी करण्यात आली होती. त्यानुसार विकासकामांचे कालबद्ध नियोजन करण्यात आले आहे.
महात्मा फुले मंडई (Mahatma Phule Mandai) समोरील मेट्रोचे काम (Metro work), दक्षिणमुखी मारूती मंदिर चौकातील रस्त्याची कामे,
शनिवारवाड्याच्या पिछाडीचा भाग, शुक्रवार पेठ, सुभाष नगर, बाजीराव रस्ता (Bajirao Road) परिसरातील समान पाणीपुरवठा योजनेसंदर्भातील विकासकामे,
हिराबाग चौकातील (Hirabag Chowk) वर्षानुवर्षे पडलेली बेवारस वाहने उचलणे आदी कामे पूर्ण करण्यात आली आहेत. सदाशिव पेठ (Sadashiv Peth),
शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता (Lakshmi Road), केळकर रस्ता (Kelkar Road), टिळक रस्ता (Tilak Road) परिसरातील रस्ता डांबरीकरणाची कामे टप्प्‌याटप्प्याने हाती घेण्यात आली असून, ती 20 जानेवारीपर्यंत पूर्ण होतील.

 

आराखड्यांची अंमलबजावणी करा – रासने
सदाशिव पेठ-शनिवार पेठ या प्रभागाला एक एकक मानून विविध प्रकारची विकासकामे खात्यांतर्गत समन्वयातून पूर्ण करण्यात
यावीत यासाठी 13 नोव्हेंबर रोजी आयुक्त विक्रम कुमार यांच्या समवेत या भागातील समस्या
आणि विकासकामांची माहिती घेण्यासाठी दौरा आयोजित करण्यात आला होता.
जशा समस्या या प्रभागात आहेत तशाच त्या अन्य 41 प्रभागांमध्ये आहेत. या दौऱ्यातून विकासाचा आराखडा तयार करण्यात आला असून,
त्याची नियोजनबद्ध अंमलबजावणी सुरू केली आहे. पुणेकरांना गुणवत्तापूर्ण,
दर्जेदार मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी अन्य प्रभागांमध्ये या आराखड्याची अंमलबजावणी करावी
असे आदेश प्रशासनाला दिल्या असल्याचे रासने यांनी सांगितले.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

 

Web Title :- Hemant Rasne | Roads in central districts of Pune will be restored by January 20, informed Standing Committee Chairman Hemant Rasane

 

हे देखील वाचा :

Omicron Covid Variant in Pune | नायजेरियातून पिंपरीत आलेल्या आणखी 4 जणांना ‘ओमायक्रॉन’ची बाधा

Pune Crime | पुणे ग्रामीण पोलिसांकडून इलेक्ट्रॉनिक्स दुकानात दरोडा टाकणारी 6 जणांची टोळी गजाआड

Mumbai Crime | ACP दिपक फटांगरे आणि IPS देवेन भारती यांच्यावर FIR; जाणून घ्या प्रकरण

 

Related Posts