IMPIMP

Ration Without Ration Card | रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ! आता रेशनकार्डशिवाय मिळणार रेशन? जाणून घ्या

by nagesh
Ration Card News | ration information on mobile know how to get facility

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Ration Without Ration Card | रेशन कार्ड हे सरकारने दिलेला एक राहण्याचा अधिकृत पुरावा आहे. रेशन
कार्ड हे सर्वसामान्य नागरीकांचे एक महत्त्वाचे कागदपत्र आहे. सरकार रेशन कार्डावर गरीबांना स्वस्त किंमतीत धान्य उपलब्ध करुन देत असते.
त्याचबरोबर कोरोना महामारीतही सरकारने मोफत रेशन दिले आहे. ती योजना सध्याही सुरू आहे. याचा फायदा शिधापत्रिकाधारकांना होतो. यामुळे
सामान्यांना एक दिलासा मिळाला. आता रेशन कार्ड शिवाय रेशन (Ration Without Ration Card) घेऊ शकाल अशा सुविधेवर सरकार काम करत
असल्याची माहिती समोर आली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

रेशनकार्ड शिवाय  रेशन ही सुविधा प्रथम उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि नंतर इतर राज्यांमध्ये सुरू होईल, अशी माहिती आहे. दरम्यान, सरकारने भारतात ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ची (‘One Nation, One Ration Card) सुविधा सुरू केलीय. आता या सुविधेत 77 कोटी लोक जोडले गेले आहेत. तुम्ही कुठेही राहात असाल तरी देखील, तुम्हाला केवळ सरकारी दुकानात जाऊन रेशनकार्ड क्रमांक (Ration Card Number) आणि आधार क्रमांक (Aadhaar Number) सांगावा लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला रेशन मिळेल.

 

 

”77 कोटी लोकांपैकी एकूण 96.8 टक्के शिधापत्रिका वापरणाऱ्यांची संख्या आहे, ज्यामध्ये केंद्रशासित प्रदेशासह 35 राज्यांतील लोकांचा समावेश आहे. सोबतच त्यांनी सांगितले की, कोणीही व्यक्ती इतर कोणत्याही शहरात अथवा राज्यामध्ये नोकरीसाठी गेल्यास रेशनकार्ड क्रमांक आणि आधार कार्डची माहिती देऊन रेशन घेऊ शकतो. तसेच त्याला मूळ शिधापत्रिका दाखवण्याची गरज भासणार नाही.” अशी माहिती केंद्रीय मंत्री पीयूष गोयल (Union Minister Piyush Goyal) यांनी दिली.

 

 

Web Title : how to take ration without ration card know in details

 

हे देखील वाचा :

SEBI Tightens IPO Bidding Rules | SEBI ने IPO मध्ये बोली लावण्याच्या नियमात केला मोठा बदल, गुंतवणुकदारांवर काय होणार परिणाम, जाणून घ्या सविस्तर

Pune Crime | सोसायटीत वावरणाऱ्या मांजरीच्या पिल्लाला 7 व्या मजल्यावरुन फेकले, हडपसर पोलीस ठाण्यात FIR

Avinash Bhosale | सीबीआयच्या नजरकैदेत असलेल्या अविनाश भोसलेंना तब्बल ‘एवढ्या’ दिवसांची CBI कोठडी

 

Related Posts