Avinash Bhosale | सीबीआयच्या नजरकैदेत असलेल्या अविनाश भोसलेंना तब्बल ‘एवढ्या’ दिवसांची CBI कोठडी

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन– येस बँक (Yes Bank) – डीएचएफएल फसवणूक प्रकरणी (DHFL Fraud Case) अटकेत (Arrest) असलेले पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांना 10 दिवसांची (8 जून) सीबीआय कोठडी (CBI Custody) सुनावली आहे. दरम्यान त्यांना 26 मे रोजी सीबीआयने बँक घोटाळा प्रकरणी (Bank Scam Case) अटक केली होती. याप्रकरणी आज मुंबईतील विशेष सीबीआय कोर्टात (Special CBI Court Mumbai) सुनावणी पार पडली. दरम्यान सीबीआयने केलेली कारवाई बेकायदेशीर असल्याचा भोसलेंचा दावा कोर्टाने फेटाळला आहे. तसेच सीबीआयला अविनाश भोसलेंना (Avinash Bhosale) मुंबईबाहेर नेण्यास कोर्टाने मनाई केली आहे. (Pune Based Builder Avinash Bhosale)
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
सीबीआयने अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांना अटक केल्यानंतर सीबीआय कोर्टात 27 मे रोजी हजर केले होते. सीबीआयनं भोसलेंची 10 दिवसांकरिता रिमांड मागितली होती. मात्र सीबीआयची कारवाई बेकायदेशीर (Illegal) असल्याचा दावा करत भोसलेंच्या वकिलांनी रिमांडला विरोध केला होता. कोर्टाने हा दावा फेटाळला आहे.
DHFL-Yes bank fraud case | Avinash Bhosale, promoter of the ABIL group of companies had termed his CBI arrest illegal, while CBI has sought his 10-day custody. Special CBI Court in Mumbai to pronounce the judgment today at 3.30 pm.
— ANI (@ANI) May 31, 2022
अविनाश भोसले हे पतंगराव कदम (Patangrao Kadam) यांचे व्याही आणि विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यांचे सासरे आहेत. ते पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती आहेत. पुण्यातील बाणेर भागात त्यांचे अलिशान घर आहे. तसेच त्यांच्याकडे तीन हेलिकॉप्टर्स आहेत. त्यांच्या घरावर हेलिपॅड आहेत. राजकारणी लोकांना ते हेलिकॉप्टर्स भाड्याने देतात त्यामुळे ते सारखे चर्चेत असतात.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
काय आहे प्रकरण ?
- येस बँक आणि डीएचएफएल घोटाळाप्रकरणी ईडी ED), सीबीआयकडून याआधी चौकशी
- 2018 साली एप्रिल ते जून दरम्यान हजारो कोटी रुपये एका खात्यातून दुसऱ्या खात्यात वळते करण्यात आले.
- वाधवान यांना येस बँकेकडून कर्ज मिळवून दिल्याचा आरोप
- सीबीआयच्या मते यात मोठ्या उद्योजकांच्या कंपन्यांचा समावेश होता.
- बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले, चित्रपट निर्माते संजय छाब्रिया (Filmmaker Sanjay Chhabria), बलवा आणि गोएंका यांचा समावेश
- ईडीकडून याआधी अविनाश भोसले यांची 40 कोटींची संपत्ती जप्त
Web Title : Avinash Bhosale | Pune based builder avinash bhosale send 10 days cbi custody by court
Comments are closed.