IMPIMP

SEBI Tightens IPO Bidding Rules | SEBI ने IPO मध्ये बोली लावण्याच्या नियमात केला मोठा बदल, गुंतवणुकदारांवर काय होणार परिणाम, जाणून घ्या सविस्तर

by nagesh
SEBI | sebi bars bombay dyeing ness wadia others from securities market for up to 2 yrs imposes rs 15-75 cr fines

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाSEBI Tightens IPO Bidding Rules | बाजार नियामक सेबी (SEBI) ने IPO मध्ये बोली लावण्यासाठी नियमांमध्ये मोठे
बदल केले आहेत. आता फक्त तेच गुंतवणूकदार पब्लिक इश्यूसाठी बोली लावू शकतील, ज्यांना कंपनीचे शेअर्स खरेदी करायचे आहेत. हा नियम सर्व
प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी लागू आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

सेबीला माहिती मिळाली होती की काही संस्थात्मक आणि श्रीमंत गुंतवणूकदार (एचएनआय) फक्त आयपीओचे सबस्क्रीप्शन वाढवण्यासाठी बोली लावत आहेत. शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा त्यांचा हेतू नव्हता. नवीन नियम सबस्क्रिप्शन डेटा वाढवण्यासाठी बोली लावण्यास प्रतिबंधित करेल. नवीन नियम 1 सप्टेंबर 2022 पासून लागू होतील.

 

नियमात झाला हा बदल
यासंदर्भात सेबीने सोमवारी एक परिपत्रक जारी केले आहे. गुंतवणूकदारांच्या बँक खात्यात त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध झाल्यावरच आयपीओ अर्जावर प्रक्रिया केली जाईल, असे या परिपत्रकात म्हटले आहे.

बाजार नियामक परिपत्रकानुसार, ‘स्टॉक एक्सचेंज त्यांच्या इलेक्ट्रॉनिक बुक बिल्डिंग प्लॅटफॉर्मवर ASBA अर्ज स्वीकारतील, जेव्हा याच्या सोबत मनी ब्लॉक झाल्याचे कन्फर्मेशन होईल.

 

सर्व गुंतवणूकदारांना लागू
नवीन नियम सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांना लागू होणार आहे.
आयपीओमध्ये बोली लावण्यासाठी किरकोळ, पात्र – संस्थात्मक खरेदीदार (QIB), गैर – संस्थात्मक गुंतवणूकदार (NII) यांसारख्या श्रेणी तयार केल्या आहेत.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

1 सप्टेंबर 2022 पासून बाजारात आलेल्या सर्व पब्लिक ÷इश्यूंना हा नियम पाळावा लागेल.
सध्या, सर्व श्रेणीतील गुंतवणूकदारांचे फंड एएसबीए आधारावर ब्लॉक केले जातात.
परंतु व्यवहारीक प्रकारे, क्यूआयबी आणि एनआयआयमध्ये काही शिथिलता आहे.

 

मार्केट रेग्युलेटरला माहिती मिळाली होती की, अलीकडील काही आयपीओमधील काही विशेष अर्ज यासाठी रद्द करावे लागले, कारण गुंतवणूकदारांच्या बँक खात्यात पुरेसे पैसे नव्हते. आता, आयपीओमध्ये बोली लावणार्‍या गुंतवणूकदारांना शेअर्सचे वाटप झाल्यानंतरच एएसबीए फ्रेमवर्कद्वारे त्यांच्या बँक खात्यातून पैसे निघतात.

 

Web Title :- SEBI Tightens IPO Bidding Rules | sebi tightens ipo bidding rules know everything here about this

 

हे देखील वाचा :

Pune Crime | सोसायटीत वावरणाऱ्या मांजरीच्या पिल्लाला 7 व्या मजल्यावरुन फेकले, हडपसर पोलीस ठाण्यात FIR

Avinash Bhosale | सीबीआयच्या नजरकैदेत असलेल्या अविनाश भोसलेंना तब्बल ‘एवढ्या’ दिवसांची CBI कोठडी

Investment Tips | चाळीशी ओलांडली असेल तरीसुद्धा बचतीसाठी झालेला नाही उशीर, केवळ ‘या’ गोष्टींकडे लक्ष देऊन बनवू शकता मोठा फंड

 

Related Posts